घरताज्या घडामोडी'व्हॅलेंटाईन डे' नाही तर 14 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार 'काऊ हग डे'

‘व्हॅलेंटाईन डे’ नाही तर 14 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार ‘काऊ हग डे’

Subscribe

या वर्षापासून १४ फेब्रुवारी हा दिवस आता व्हॅलेंटाईन डे म्हणून नाही तर 'काऊ हग डे' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे भाजपच्या सर्वच केंद्रीय मंत्र्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खूप जास्त खास आणि महत्वाचा असतो. भारतात देखील व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. पण या वर्षापासून १४ फेब्रुवारी हा दिवस आता व्हॅलेंटाईन डे म्हणून नाही तर ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे भाजपच्या सर्वच केंद्रीय मंत्र्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

‘काऊ हग डे’ हा उत्तम निर्णय : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, ”14 फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचा घेण्यात आलेला निर्णय अतिशय चांगला आहे. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. आपण सर्वांनी गायींवर प्रेम केले पाहिजे. त्यांना मिठी मारली पाहिजे.”

- Advertisement -

तर केंद्रीय मंत्री साध्वी निरंजना ज्योती यांनी सुद्धा गायींमध्ये 33 कोटी देव देवी-देवता वास करत असल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबद्दल बोलताना साध्वी निरंजना ज्योती म्हणाल्या की, ‘गायीला आपली माता मानली जाते आणि आपण तिला मिठी मारली पाहिजे. या निर्णयासाठी मी माननीय मंत्री महोदयांचे आभार मानते. गाय आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत दूध देते, तिचे दूध आपण पितो. 9 महिने आपल्याला गर्भात ठेवणाऱ्या आईची आपण पूजा करतो मग गाईची का नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

वैदिक परंपरेला प्रोत्साहन दिले पाहिजे : भारतीय प्राणी कल्याण मंडळ
‘वैदिक परंपरेला’ प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय प्राणी कल्याण मंडळाने लोकांना 14 फेब्रुवारी रोजी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटामुळे आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनच्या स्पाय बलूनचे सत्य उघड

केंद्रीय मंत्री म्हणाले की, ‘एकीकडे 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे, तर दुसरीकडे अॅनिमल वेल्फेअर सोसायटी ऑफ इंडियाने व्हॅलेंटाइन डेमुळे त्रासलेल्या लोकांना आणखी एक पर्याय दिला आहे. त्यांना हवे असल्यास ते काऊ हग डे साजरा करू शकतात. भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना व्हॅलेंटाईन डे साजरा करणे कठीण जाते आणि म्हणूनच त्यांच्यासाठी सरकारने हा दिवस काऊ हग डे म्हणून घोषित केला आहे.’

दरम्यान, पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. 14 फेब्रुवारीला यावर्षी पासून साजरा करण्यात येणाऱ्या ‘काऊ हग डे’बद्दल बोलताना राऊत म्हणाले की, ‘आमची याकडे बघण्याची इच्छाच नाहीये. कारण त्यांची ‘होली काऊ’ म्हणजे अदानी आहे. अदानींना हग करून ते बसले आहेत. त्याला आम्ही होली काऊ म्हणतो. एवढ्या मोठ्या काऊला त्यांनी हग केल्यामुळे दुसऱ्या गायींचं या देशात काय राहिलंय? आम्हाला अदानीला हग करता येत नाही. त्यामुळे आमच्यासाठी त्यांनी गायी सोडल्या आहेत. पण गाय गोमाता आहे, त्या गोमातेचा आम्ही आदर करतो.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -