घरदेश-विदेशग्रामीण विकास मंत्रालयात नोकरीची संधी! १० रिक्त पदांसाठी भरती; आजच करा ऑनलाईन...

ग्रामीण विकास मंत्रालयात नोकरीची संधी! १० रिक्त पदांसाठी भरती; आजच करा ऑनलाईन अर्ज

Subscribe

भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करण्याची इच्छा तुम्हाला असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मंत्रालयाच्या नॅशनल रूरल डेव्हलपमेंट एजन्सी (NRDA) ने ८ वेगवेगळ्या पदांच्या एकूण १० रिक्त पदांची भरती काढली आहे. एजन्सीच्या या जाहिरातीनुसार आयटी प्रोडक्ट मॅनेजर आणि इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. NRDA द्वारे करण्यात येणाऱ्या पदांची नियुक्ती प्रतिनियुक्ती/करार आधारावर केली जाणार आहे.

असा करा अर्ज

कराराच्या आधारावर करण्यात येणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना एनआरडीएच्या pmgsy.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर एनआरडीए वेबसाइटवर दिलेला अर्ज भरून पीडीएफ स्वरूपात [email protected] वर दिलेल्या ईमेल आयडीवर मेल करावा. ऑनलाईन अर्जाची तसेच ईमेलद्वारे पीडीएफ मेल करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

- Advertisement -

पदांनुसार रिक्त जागा

संयुक्त संचालक – 2 पदे
उपसंचालक – 1 पद
सहाय्यक संचालक – 1 पद
वरिष्ठ सल्लागार (तांत्रिक) – 2 पदे
डेटा सायंटिस्ट – 1 पद
प्रोडक्ट मॅनेजर आयटी – 1 पद
प्लानिंग आणि जीआयएस लीड – 1 पद
ट्राफिक आणि ट्रान्सपोर्ट प्लानिंग अभियंता – 1 पद

  • संयुक्त संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक – सिव्हिल इंजीनियरिंग पदवी आणि ५ वर्षांचा अनुभव.
  • डेटा सायंटिस्ट – ३ वर्षांच्या अनुभवासह इकनॉमिक्स किंवा मॅथ्स किंवा कंप्यूटर सायन्स किंवा इतर संबंधित विषयातील पदवी
  • प्लानिंग आणि जीआयएस लीड – सिव्हिल इंजिनीअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी किंवा संबंधित विषयात मास्टर्स आणि 6 वर्षांचा अनुभव.
  • ट्राफिक आणि ट्रान्सपोर्ट प्लानिंग अभियंता – सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि 2 वर्षांचा अनुभव.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -