घरताज्या घडामोडीगणेशोत्सवासाठी मुंबई पालिकेची नियमावली जाहीर

गणेशोत्सवासाठी मुंबई पालिकेची नियमावली जाहीर

Subscribe

गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यायची का यावर पोलिसांशी चर्चा करुन वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येणार

यंदा देखील गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागला होतो. यंदा देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. गणेशोत्सवानिमित्त आज मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवासाठी मुंबई पालिकेची नियमावली जाहीर करण्यात आली. (Mumbai BMC announced rules for Ganpati festival)   यंदाच्या गणेशोत्सवात गेल्या वर्षींचे नियम कायम राहणार आहेत. गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यायची का यावर पोलिसांशी चर्चा करुन वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी परळ येथे पालिका प्रशासन व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवाबाबत शासन व पालिका यांनी तयार केलेल्या नियमांची माहिती गणेशोत्सव मंडळांना देण्यात आली.

- Advertisement -

यंदाचा गणेशोत्सवही गतवर्षीप्रमाणेच साधेपणानेच साजरा करण्यात यावा, यावर राज्य शासन व महापालिका यांनी जोर दिला आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गर्दी वाढली व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून तिसरी लाट धडकली तर शासन व पालिका प्रशासन यांच्यासमोर कोरोनाचा रोखण्याबाबत मोठे संकट उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

मागील वर्षींच्या नियमांप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मूर्ती ४ फूटांच्या असणे गरजेचे आहे. तर घरगुती गणेशमूर्ती २ फूटांच्या असणे गरजेचे आहे. याची सर्व गणेशोत्सव मंडळांनी दखल घेणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळात भाविकांची गर्दी होणार नाही याची काळजी गणेशोत्सव मंडळांनी घेणे महत्त्वाचे आहे. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मूर्ती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावी लागणार आहे.

यंदाही सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास सार्वजनिक मंडळांनी आक्षेप घेतल्याने यंदा केवळ १० कार्यकर्त्यांना गणेश मंडप ते विसर्जन स्थळापर्यंत म्हणजे समुद्र चौपाटीपर्यंत गणेश मूर्ती नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र तेथे गणेश मूर्तींचे विसर्जन हे पालिका कर्मचारी हेच करणार आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विसर्जनाला जाण्यासाठी परवानगी नाही.

गणेश मंडळांनी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी. तसेच, मंडपात गर्दी होण्याची शक्यता असल्याने ऑफलाईन दर्शनासाठी परवानगी देण्याबाबत राज्य सरकारच्या आदेशाने योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उपायुक्त शरद काळे यांनी सांगितले.

गणेश मूर्तींची उंची ४ फुटांपेक्षा जास्त असावी, यासाठी परवानगी देण्यात यावी. गणेश मंडळात लसीचे २ डोस घेतलेल्या कार्यकर्त्याना मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्यात यावी. तसेच, गणेश भक्तांना ऑनलाईन व ऑफलाईन दर्शन घेता यावे यासाठी परवानगी देण्याची यावी, आदी मागण्या गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे (शहर) अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी दिली.


हेही वाचा – गणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची सेवा, असं आहे वेळापत्रक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -