घरदेश-विदेशआसाममधील तेलाच्या खाणीतील आग भडकली; दोन जणांचा मृत्यू तर ६ जखमी

आसाममधील तेलाच्या खाणीतील आग भडकली; दोन जणांचा मृत्यू तर ६ जखमी

Subscribe

आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सरकारी गॅस कंपनी ऑईल इंडियाच्या तेलाच्या खाणीला आग लागली असून ही आग आता पसरू लागली आहे. या आगीमुळे २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. तिनसुकिया ऑयल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या तेल खाणीला भीषण आग लागल्याची माहिती आसामच्या पर्यावरण तसेच वन मंत्री परिमल सुखाबैद्य यांनी दिली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आसाम सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र ही आग आता जास्तच पसरू लागली असून आजूबाजूच्या नागरिकांचा त्याची झळ पोहोचू लागली आहे. आसामच्या पर्यावरण मंत्र्यांनी माहिती दिली की, आसाम सरकार आग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशिने प्रयत्न करत आहे. मात्र ही आग आता झपाट्याने पसरत आहे. गावापर्यंत पोहोचलेल्या आगीमुळे ६ गावकरी जखमी झाले आहेत. दरम्यान, सर्बानंद सोनोवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी यासंबंधी चर्चा केली आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते ही आग नियंत्रणात येण्यास एक महिन्याला कालावधी लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्याने केंद्राकडे मागितली मदत 

गेल्या १४ दिवसांपासून या तेलाच्या खाणीतून गॅसची गळती होत होती. ही आग इतकी भीषण आहे की त्याचे लोळ ३० किमीपासून दूरवर पाहता येतात. तसेच कितीतरी मीटर उंच आगीचा धुर आकाशात पाहायला मिळत आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिली असून तात्काळ मदत मागितली आहे. तसेच केंद्रानेही मुख्यमंत्र्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

देशभरात २४ तासांत ९ हजार ९८५ नवे रुग्ण; २७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -