घरदेश-विदेशनरेंद्र मोदींची भारतविरोधी शक्तींसमोर शरणागती - ओमर अब्दुल्ला

नरेंद्र मोदींची भारतविरोधी शक्तींसमोर शरणागती – ओमर अब्दुल्ला

Subscribe

'विधानसभा निवडणुका पुढे ढकलत मोदींनी पाकिस्तान, दहशतवादी आणि हुर्रियतसमोर नांगी टाकली आहे आणि या शक्तीपुढे त्यांची ५६ इंचाची छाती फेल झाली आहे', अशा अर्थाची टीका ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मृत्यूचा वाढता आकडा ही मोदी सरकारसाठी शरमेची गोष्ट आहे’, अशी टीका करणारे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका लोकसभेसोबत एकत्र न घेता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच मुद्द्यावरुन अब्दुल्ला यांनी ट्वीटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ‘जम्मू-काश्मीरमधील निवडणुका पुढे ढकलून मोदींनी भारतविरोधी शक्तींसमोर शरणागती पत्करली आहे,’ असं वक्तव्य अब्दुल्ला यांनी ट्वीटद्वारे केलं आहे. ‘विधानसभा निवडणुका पुढे ढकलत मोदींनी पाकिस्तान, दहशतवादी आणि हुर्रियतसमोर नांगी टाकली आहे आणि या शक्तीपुढे त्यांची ५६ इंचाची छाती फेल झाली आहे’, अशा अर्थाची टीका अब्दुल्ला यांनी केली आहे.

- Advertisement -

‘१९९६ पासून आजपर्यंत जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका पहिल्यांदाच वेळेत होणार नाहीयेत. पुढच्यावेळी एक सक्षम नेतृत्व म्हणून मोदींचं नाव पुढे करताना याचा विचार करावा’, असंही ओमार यांनी म्हटलं आहे.

ट्वीटच्या माध्यमातून ओमर अब्दुल्ला म्हणातात की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थित हाताळल्याचे बालोकोट आणि उरी ही काय प्रतिकं नाहीत. मोदींनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. जम्मू-काश्मीरची परिस्थिती मोदी सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळली आहे’, असा आरोपही त्यांनी केला आहे. ‘जम्मू-काश्मीरमधील निवडणुका या आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी ठरणाऱ्या असल्या, तरी मोदींनी त्या पुढे ढकलत आपल्या अपयशाची जगाला कबुली दिली आहे. मोदी असं काही करतील याची मला कधीच अपेक्षा नव्हती’, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -