घरदेश-विदेशममतादीदींच्या आंदोलनाला विरोधकांचा पाठिंबा; मात्र प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टात

ममतादीदींच्या आंदोलनाला विरोधकांचा पाठिंबा; मात्र प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टात

Subscribe

ममता बॅनर्जी यांनी संविधान बचावची घोषणा देत धरणे आंदोलनाला सुरुवात केली असून त्यांच्या या भूमिकेला विरोधकांनीही समर्थन दर्शवले आहे.

चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकातामध्ये पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या सीबीआय चौकशीच्या विरोधात रविवार रात्रीपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संविधान बचावची घोषणा देत धरणे आंदोलनाला सुरुवात केली असून त्यांच्या या भूमिकेला विरोधकांनीही समर्थन दर्शवले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव तसेच तेजस्वी यादव यांच्यासह देशभरातील अन्य राजकीय नेत्यांनीही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर समाजवादी पार्टीचे नेते किरणमॉय नंदा यांनी कोलकत्याला जाऊन ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनस्थळी त्यांची भेट घेतली आहे. दरम्यान, शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकाता पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सीबीआयने कोलकाता पोलिसांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली असून या प्रकरणी उद्या, मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

ट्वीट करत दर्शवले समर्थन 

आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज कोलकात्यात पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, बसपा अध्यक्षा मायावती तसेच सर्वच विरोधीपक्षांनी ममतांशी फोनवरुन बोलणे झाले असून त्यांच्याबरोबर असल्याचे जाहीर केले आहे. तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील ट्विट करीत केंद्र सरकारवर सीबीआयचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप केला. त्यांनी ममतांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवित म्हटले की, आज देश आणि संविधान संकटात आहे. विरोधीपक्ष आणि जनता आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला हारवण्यासाठी एकजूट असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले, मोदी-शाहच्या जोडीचे काम हे विचित्र आणि लोकशाहीविरोधी आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी मोदी-शाह हे देशाच्या लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी संविधान बचावची घोषणा देत धरणे आंदोलनाला सुरुवात केली असून त्यांच्या या भूमिकेला विरोधकांनीही समर्थन दर्शवले आहे.

वाचा – पश्चिम बंगालमध्ये थरारक नाट्य,सीबीआय आणि पोलीस आमने सामने

वाचा – भाजपला संपवण्यासाठी नायडू – ममता बॅनर्जी एकत्र!

वाचा – Lok Sabha 2019 : पंतप्रधानपदावर आत्ता चर्चा नको – ममता बॅनर्जी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -