घरमहाराष्ट्रएसटी वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठीच चालू राहणार - अनिल परब

एसटी वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठीच चालू राहणार – अनिल परब

Subscribe

राज्यात संचारबंदीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत जिल्ह्यात आणि जिल्हा बाहेर देखील एसटी सुरु राहतील. मात्र त्या अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु राहतील, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. यासंदर्भात एसटीचं कशापद्धतीने नियोजन असेल यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती परब यांनी दिली. त्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार. परंतु, आता ज्या काही सरकारने सूचना केल्या आहेत, त्यानुसार एसटी केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु राहतील.

राज्य सरकारने दिलेल्या सूचानांनुसार एसटी केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहतील. जिल्ह्याअंतर्गत किंवा जिल्ह्याबाहेर केवळ अत्यावशक सेवेसाठी एसटी चालू राहणार. सरकारच्या निकषानुसार बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्यांनी किती दिवस क्वारंटाईन करायचं? कशा पद्धतीने करायचं? क्वारंटाईनचे शिक्के कसे मारायचे? याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, असं अनिल परब म्हणाले. अत्यावश्यक सेवेसाठी एसटी सुरु असल्यामुळए एसटीची संख्या कमी होईल.

- Advertisement -

ऑक्सिजन एक्सप्रेस उद्या येणार

आज ऑक्सिजन आणखी कुठून मिळवता येतील याबाबत नवे पर्याय शोधले जातील. ऑक्सिजनचे टँकर आल्यानंतर त्याचं वितरण करणं ही परिवहन विभागाची जबाबदारी आहे. २५ टक्के मालवाहतूक एसटी करेल. ऑक्सिजन एक्सप्रेस उद्या येणार आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -