घर क्राइम Pakistan : ईशनिंदेच्या आरोपात अडकवण्याचा कट; 17 चर्च, 100 घरांचे नुकसान; फाशीची शिक्षा होणार?

Pakistan : ईशनिंदेच्या आरोपात अडकवण्याचा कट; 17 चर्च, 100 घरांचे नुकसान; फाशीची शिक्षा होणार?

Subscribe

Pakistan : गेल्या महिन्यात पूर्व पाकिस्तानमध्ये (Pakistan) अनेक चर्च आणि ख्रिश्चनांच्या घरांवर जमावाने हल्ले केले होते. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. धक्कादायक बाब अशी की, वैयक्तिक वादातून तीन ख्रिश्चन तरुणांनी इस्लामच्या पवित्र ग्रंथाची पाने पीडितांच्या घराबाहेर फेकून त्यांना ईशनिंदेच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला होता. दरम्यान, पोलिसांनी आज (4 सप्टेंबर) मुख्य सुत्रधाराला अटक केली आहे. (Pakistan Conspiracy to implicate in blasphemy charges 17 churches 100 houses damaged Death penalty)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांनी कट रचल्याची कबुली दिली आहे. त्यांनी पीडित राजा आमिरच्या घराबाहेर कुराणाची पाने फेकली. मुस्लिमांनी कुराणचा अपमान केल्याचा आरोप केल्यानंतर आमिर आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली होती.  मात्र आता गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार परवेझ कोडू या अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठग सुकेश चंद्रशेखर उभारणार जॅकलीनसाठी महागडे रुग्णालय; कुत्र्या, मांजरावर होणार फुकटात उपचार

परवेझ कोडू याला संशय होता की, पीडित आमिरचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध आहे. त्यामुळे त्याने पवित्र ग्रंथाची पाने मुस्लिमांच्या घराबाहेर फेकली. जेणेकरून इतर मुस्लिमांकडून आमिरला लक्ष्य केले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई करतील. मात्र आता तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हिंसा भडकवल्याचा तसेच आमिर आणि त्याच्या भावाला ईशनिंदा प्रकरणात अडवण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, ईशनिंदेच्या घटनेनंतर पंजाब प्रांतातील जरनवाला शहरात गेल्या महिन्यात 16 ऑगस्ट रोजी जमावाने हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात 17 चर्च आणि सुमारे 100 घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हा हल्ला देशातील ख्रिश्चनांवरचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. या घटनेनंतर तेथील अधिकाऱ्यांनी बहुतेक चर्चची दुरुस्ती केली आहे. याशिवाय ज्यांची घरे खराब झाली आहेत अशा सुमारे 100 कुटुंबांना हजारो डॉलर्स दिले आहेत. या घटनेत सहभागी असलेल्या 200 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे.

हेही वाचा – Mumbai Crime : ट्रेनी एअर होस्टेसचा पवईमध्ये संशयास्पद मृत्यू; एका संशयीतास अटक

ईशनिंदा कायद्यानुसार फाशीची शिक्षा

पाकिस्तानच्या ईशनिंदा कायद्यानुसार, इस्लामचा अपमान केल्याप्रकरणी दोषी आढळल्यसा आरोपीला फाशीची शिक्षा होऊ शकते. मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणात ईशनिंदेसाठी फाशीची शिक्षा लागू केलेली नाही, असे समजते.

- Advertisment -