Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश "उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी", लोढांची राज्य सरकारकडे मागणी

“उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी”, लोढांची राज्य सरकारकडे मागणी

Subscribe

मुंबई : उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी, अशी मागणी राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केली आहे. सनातन धर्माबद्दल बेताल वक्तव्य करून लाखो लोकांच्या भावना दुखावण्याचा उदयनिधी स्टॅलिनला काय अधिकार? त्याच्या द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही, अशी भीती मंगल प्रभात लोढा यांना दिले आहे.

कॅबिनेट मंत्री लोढा यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त करताना म्हटलं आहे की “या लोकांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही! कारण, सनातन संस्कृती ही कोणत्याही प्रकारे प्रभावी औषधासारखी आहे, जी राष्ट्र विरोधी विचारधारेला भारतात वाढू देत नाही! तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्म संपवण्याचे बोलून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मी विनंती करतो की, उदयनिधी स्टॅलिन, जोवर त्याचे विधान मागे घेत नाही, तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी! अशा लोकांना महाराष्ट्रात येऊ देऊन, आम्ही इथले वातावरण बिघडू देणार नाही!”

- Advertisement -

हेही वाचा – Udayanidhi Stalin यांच्या सनातन धर्माबद्दलच्या वक्तव्यानंतर खर्गेंच्या विधानाने वाद चिघळणार?

काय आहे संपूर्ण प्रकरण

- Advertisement -

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी राजधानी चेन्नईमध्ये एका सभेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया, कोरोना सारख्या आजारांसोबत केली. ते म्हणाले, ‘मच्छर, डेंग्यू, कोरोना हे असे रोग आहेत, ज्यांचा आम्ही फक्त विरोध करु शकत नाही. तर यांचे समूळ उच्चाटन करावं लागतं. सनातन धर्म देखील असाच आहे. सनातनचा फक्त विरोध करुन चालणार नाही, तर त्याला मुळातून संपवावे लागणार आहे.’

- Advertisment -