घरदेश-विदेशपाकिस्तानला महापुराचा तडाखा, अन्नधान्यासाठी भारताची घेणार मदत?

पाकिस्तानला महापुराचा तडाखा, अन्नधान्यासाठी भारताची घेणार मदत?

Subscribe

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील बलुचिस्तान, पंजाब आणि सिंध प्रांतांना महापुराचा तडाखा बसला आहे. यामुळे संपूर्ण देशातील अन्नधान्य आणि भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. भारतातून भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ आयात करण्याच्या पर्यायाची चाचपणी पाकिस्तानने सुरू केली आहे. पुरात आत्तापर्यंत 1100 मृत्यू झाले आहेत.

काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पाकिस्तानला महापुराचा विळखा पडला आहे. शेतीप्रधन आणि समृद्ध पंजाब आणि सिंध प्रांतात महापुरामुळे शेती उद्ध्वस्त झाली आहे. पाकिस्तानात आत्तापर्यंत 1061 लोकांचा मृत्यू झाला आहे तर त1575 नागरिक जखमी झाले आहेत. अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे भाव वाढले आहेत. याबाबत पाकचे केंद्रीय अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी भारताकडून भाज्या व इतर खाद्यान्ने आयात करण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल, असे सांगीतले. भारत सरकारने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतातून होणारी आयात कमी केली होती.

- Advertisement -

ही आहे परिस्थिती –

  • १०६१ मृत्यू
  • १५७५ जखमी
  • ३ कोटी ३० लाख नागरिक विस्थापित
  • ७ लाख १९ हजार ५५८ जनावरांचा मृत्यू
  • ९ लाख ९२ हजार ८७१ घरे उद्ध्वस्त

देशातील परिस्थिती लवकर सुरळीत होण्याची अशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

- Advertisement -

पुरामुळे पाकिस्तानमध्ये झालेले नुकसान पाहून दु:ख झाले. मृतांचे कुटुंबीय, जखमी नागरिक आणि पुराने नुकसान झालेल्यांप्रति आणि शोकवेदना व्यक्त करतो. देशातील परिस्थिती लवकर सुरळीत होण्याची अशा व्यक्त करतो, अशा, शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -