घरताज्या घडामोडीकराची अपघाताच्या अवशेषांमध्ये सापडली तीन कोटींची रोख रक्कम!

कराची अपघाताच्या अवशेषांमध्ये सापडली तीन कोटींची रोख रक्कम!

Subscribe

पाकिस्तानमधील कराची विमान अपघातातील अवशेषांमध्ये एका पिशवीत विविध देशांच्या चलनी नोटा आणि नाणी सापडली. त्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमानाचा कराचीमध्ये मोठा अपघात झाला. या अपघातात ९७ जणांचा मृत्यू झाला आणि दोन प्रवाशांचा जीव वाचला. यामध्ये ९१ प्रवासी आणि ८ क्रू सदस्य होते. आता या अपघाताच्या अवशेषांमध्ये तीन कोटी रुपयांची रक्कम सापडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, कराची मधील या अपघातानंतर या विमानाचे अवशेष हटवण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी नीट तपासणी करण्यात येत होती. अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषांमध्ये सामनांचा शोध घेण्यात येतो आणि त्यानंतर ते सामनांच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात येत. त्यानुसार, या अपघातग्रस्त विमानांतील अवशेषांमध्ये सामान शोधण्याची मोहीम सुरू होती. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी दोन पिशव्या सापडल्या. त्या पिशव्या जड होत्या म्हणून त्यांनी त्या उघडल्या. त्या पिशव्या उघडल्यानंतर अधिकारी आश्चर्यचकीत झाले.

- Advertisement -

त्या पिशव्यामध्ये विविध देशांच्या चलनी नोटा आणि नाणी सापडली. या सर्व नोटांची आणि नाण्यांची किंमत जवळपास तीन कोटी असल्याची माहिती समोर आली आहे. इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था विमानतळावर असताना अशा प्रकारे परकीय चलन विमानात कसे आले, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तसेच या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी हा अपघात एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या इशाऱ्याकडे वैमानिकाने कानाडोळा केल्यामुळे झाल्याचे सांगितले गेले होते. वैमानिकाने इशाऱ्याकडे लक्ष दिले असते तर हा विमानाचा मोठा अपघात टाळता आला असता, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत मृतांचा आकडा पुन्हा वाढला, २४ तासांत १,२९७ जणांचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -