घरताज्या घडामोडीPakistan-Taliban : तालिबान पाकसाठी ठरू शकतो धोकादायक, पाकिस्तानच्या मंत्र्यांचं मोठं विधान

Pakistan-Taliban : तालिबान पाकसाठी ठरू शकतो धोकादायक, पाकिस्तानच्या मंत्र्यांचं मोठं विधान

Subscribe

तालिबान आणि पाकिस्तानच्या मैत्रीत आता फूट पडली आहे. अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तानने तालिबानला शस्त्र आणि ट्रेनिंग देत पाठिंबा दिला होता. परंतु तालिबान आता पाकिस्तानवर उभा ठाकला आहे. पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी तालिबानच्या हुकुमशाहीवर टीका केली आहे. यामध्ये महिलांवर अनेक प्रकारची बंधनं लादण्यात आली आहेत. फवाद चौधरीने अशा प्रकारचे विचार पाकिस्तानसाठी घातक ठरू शकतात, असं म्हटलं आहे. कारण ही विचारसरणी पाकिस्तानसाठी धोकादायक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय.

तालिबानचे विचार पाकसाठी घातक

इस्लामाबादमधील एका कार्यक्रमात फवाद चौधरी म्हणाले की, आम्ही पाकिस्तानची मदत करू इच्छितो. कारण तालिबानची विचारसरणी घृणास्पद आहे. त्यामुळे महिला एकट्या प्रवास करू शकत नाहीत किंवा शाळा आणि कॉलेजमध्ये सुद्धा एकट्यानं जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारची रूढीवादी विचारसरणी पाकिस्तानसाठी धोकादायक आहे. पाकिस्ताननं स्वत: च्या प्रगतीचा मार्ग तयार करायला हवा, अशी गरज आणि चिंता यावेळी फवाद चौधरी यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानची निर्मिती अल्पसंख्याकांच्या हिताच्या रक्षणासाठी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान हे धार्मिक राष्ट्र व्हावं अशी जिना यांचीही इच्छा नव्हती, असंही चौधरी म्हणाले.

- Advertisement -

महिलांवर निर्बंध आणि अटी..

अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानने महिलांच्या प्रवासासाठी एक नवीन अट ठेवली आहे. महिलांना सार्वजिनक बस किंवा इतर वाहनांतून दूरवरचा प्रवास एकट्यानं करण्यावर बंदी घालण्यात आली. ७० किमीपर्यंत अधिक दूरवरचा प्रवाश महिलांनी एकट्यानं करता कामा नये. यासाठी त्यांच्यासोबत एखादा पुरुष संरक्षक असणं गरजेचं असेल, अशा प्रकारच्या अटी लादण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : अत्तराचेही राजकरण आपल्या देशात होऊ शकतं, खासदार संजय राऊत

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -