घरCORONA UPDATEOmicron Variant : अमेरिका, ब्रिटन, फ्रान्समध्ये कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत आढळले २...

Omicron Variant : अमेरिका, ब्रिटन, फ्रान्समध्ये कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत आढळले २ लाख रुग्ण

Subscribe

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट आता जगासाठी पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या महिन्याभरात ओमिक्रॉन संसर्गाचा वाढता वेग पाहता अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर लसीकरण आणि टेस्टींवर भर दिला जातोय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता जागतिक आरोग्य संघटनेनेही ओमिक्रॉन व्हेरिएंटला ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’मध्ये स्थान दिले. यात दक्षिण आफ्रिका, यूके, फ्रान्स, इटली आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट सुरु झाली आहे.

फ्रान्समध्ये कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतोय. फ्रान्समध्ये गेल्या २४ तासांत सुमारे १,८०,००० कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने युरोपातील कोरोना संख्येने उच्चांक गाठला आहे. फ्रान्समध्ये गेल्या २४ तासांत सुमारे १,७९, ८०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली अशी माहिती फ्रान्स आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे कोरोना महामारीनंतर ही रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली.

- Advertisement -

फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलिविअर वेरन यांनी बुधवारी सांगितले की, देशात डिसेंबरच्या शेवटापर्यंत संसर्ग मोठ्याप्रमाणात पसरेल. सध्या फ्रान्समध्ये ७७ टक्के नागरिकांचे कोरोनाविरोधी लसीकरण झालेय. गेल्या आठवड्यात फ्रान्समध्ये १ हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे फ्रान्समधील कोरोना मृतांची संख्या जवळपास १२२,००० हून अधिक आहे,

ब्रिटनमध्येही कोरोनाचा प्रसार वेगाने होतोय. ब्रिटनमध्ये एका दिवसात १,२९,४७१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आत्तापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर ब्राझीलमध्येही मंगळवारी कोरोनाचे ८४३० नवे रुग्ण आढळून आलेत. तर १७१ रुग्णांचा मृत्यू झालाय. दक्षिण अमेरिकेत या कोरोनामुळे ६१८७०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत २२,२५४,७०६ लोकांना संसर्ग झाला आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंत्री परिषदेची बैठक घेणार आहेत. आज दुपारी ४ वाजता यासंदर्भात मंत्रिपरिषदेची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला सर्व मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबतही चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

देशातील २१ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार

जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हटले की, भारताने आतापर्यंत २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये Omicron प्रकारांची ६५३ प्रकरणे आढळली आहेत. त्यापैकी १८६ लोक बरे झाले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -