घरदेश-विदेशपाकिस्तानच्या हवाई हद्दीत राष्ट्रपतींच्या विमानाला परवानगी नाही

पाकिस्तानच्या हवाई हद्दीत राष्ट्रपतींच्या विमानाला परवानगी नाही

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्यासाठी पाकिस्तानने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानासाठी करता येणार नाही. रामनाथ कोविंद सोमवारपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावर जाताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीच्या मार्ग सोप्पा आणि त्या मार्गाने कमी वेळ लागणार आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानकडे हवाई हद्दीत राष्ट्रपतींच्या विमानाला परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र, पाकिस्तानने ही विनंती फेटाळून लावली आहे.


हेही वाचा – मोदींच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान शेतकरी नजरकैद

- Advertisement -

 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रींनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी शनिवारी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत काश्मीर मुद्द्यावरुन भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर हवाई हद्दीत परवानगी न दिल्याच्या निर्णयसोबत आपण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारी आईसलँड, स्विर्त्झलँड आणि स्लोव्हेनिया या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारतात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीर तेथील देशांशी ते चर्चा करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -