घरमहाराष्ट्रमोदींच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान शेतकरी नजरकैद

मोदींच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान शेतकरी नजरकैद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान काही शेतकरी नेत्यांना पोलिसांनी नजरकैद ठेवले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबाद दौऱ्यावर आले असता काही शेतकऱ्यांना पोलसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या शेतकऱ्यांनी मोदींच्या सभेदरम्यान आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांना नजरकैद ठेवण्यात आले. यामध्ये शेतकरी नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. या आंदोलनकर्त्यांना पोलीस आयुक्तालयात तर काहींना अधिक्षक कार्यालयात नजरकैद ठेवण्यात आले होते.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी महाराष्ट्र दौरा केला. शनिवारी सकाळी मोदी मुंबईत दाखल झाले. मुंबईतील विकास कामांचे उद्घाटन केल्यानंतर मोदी औरंगाबाद येते रवाना झाले. औरंगाबादमध्ये त्यांच्या हस्ते ऑरिक सिटीचे उद्घाटन करण्यात आले.

शेतकरी नेत्यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. सरकारी योजनांचा काहीही फायदा गरिबी, होतकरु शतकऱ्यांना होत नाही, असा दावा शेतकरी नेते जयाजी सुर्यवंशी यांनी केला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबादमध्ये कार्यक्रमासाठी आल्यावर आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच त्यांच्या घरावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शनिवारी सकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तालयात नजरकैद ठेवले.

- Advertisement -

‘या’ आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

जयाजी सुर्यवंशी यांची शेतकरी अन्नदाता संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांना आणि इतर आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलकांच्या काही मागण्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:

  • बिडकीन औद्योगिक वसाहतीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मोबदल्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. अखेर दोन वर्षांनी त्यांना बिगरव्याज मोबदला मिळाला. या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळावा.
  • शेतकऱ्यांना विनाअट हा मोबदला मिळावा.
  • राज्यातील सातबारा कोरा करावा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -