घरदेश-विदेशभारताने IT क्षेत्रात विकास केला पण आपलं दुर्दैव... इम्रान खान सरकारने केली...

भारताने IT क्षेत्रात विकास केला पण आपलं दुर्दैव… इम्रान खान सरकारने केली भारताशी तुलना

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात भारताचे उदाहरण देत पाकिस्तानची भारताशी तुलना केली आहे. भारताने IT क्षेत्रात विकास केला पण आपलं दुर्दैव आपण या क्षेत्राकडे लक्षचं दिलं नाही अशी खंत इम्रान खान यांनी व्यक्त केली. यावर बोलताना इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तान भारताच्या खूप मागे आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पाक वेगाने वाटचाल करू शकत होता. जग खूप वेगाने पुढे जातेय मात्र पाकिस्तान यात खूप मागे आहे. आपला शेजारी देश भारत १५ ते २० वर्षांपूर्वी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आला आणि आज त्यांची निर्यात सुमारे १५० अब्ज डॉलर्स इतकी आहे. मात्र ७० टक्के सुधारणा होऊनही पाकिस्तानची निर्यात केवळ २ अब्ज डॉलर इतकीच आहे.

लाहोरमध्ये स्पेशल टेक्नॉलॉजी झोन, टेक्नोपोलिस प्रकल्पाचे उद्घाटनावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान भारताच्या तुलनेत खूप मागे असल्याची जाहीर कबूली दिली. “जग आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने वाटचाल करतय. मात्र यात पाकिस्तान खूप मागे पडत आहे. देशातील निर्यात वाढवायची असेल तर आयात वाढवावी लागेल. कोरोनाच्या काळात इतर कंपन्या तोट्यात असताना तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा महसूल दुप्पट झाला. हेच मुख्य कारण आहे की, जग आता तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि पाकिस्तान मागे पडत आहे.” असं इम्रान खान म्हणाले.

- Advertisement -

इम्रान पुढे म्हणाले की, “पाकिस्तानसाठी पुढेही आदर्श परिस्थिती आहे, कारण पाकिस्तानच्या २२० दशलक्ष लोकसंख्येपैकी ६० पेक्षा जास्त लोक ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि आपण वेगाने विकास करू शकतो. पण दुर्दैवाने आपण आपला शेजारी देश भारताच्या मागे राहतोय. भारताने आपल्या १५ ते २० वर्षांपूर्वी IT जगतात प्रवेश केला आणि आपल्या आधी IT क्षेत्रात विकास केला पण आपलं दुर्दैव आहे की, आपण आपल्या देशात या क्षेत्रावर कधीच भर दिला नाही. यामुळे जे देश निर्यातीत आपल्या मागे होते ते आज पुढे गेलेत.

इम्रान खान पुढे म्हणाले की, जोपर्यंत देशात संपत्ती येत नाही, तोपर्यंत समृद्धी येणार नाही. ४० वर्षांपूर्वी आपला शेजारी देश चीन कुठे होता आणि आता कुठे आहे. चीनने आपल्या देशात दोन मोठ्या गोष्टी केल्या. प्रथम, चीनने योजनेअंतर्गत भ्रष्टाचार संपवला आणि मंत्री स्तरावरील ४५० लोकांना तुरुंगात टाकले. त्यांनी दुसरे काम केले ते म्हणजे ४० वर्षांत ७० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे. निर्यातीवरही त्यांनी भर दिला.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -