घरअर्थजगतGold-Silver Price Today: चांदी झाली स्वस्त, सोन्याची किंमत किती?

Gold-Silver Price Today: चांदी झाली स्वस्त, सोन्याची किंमत किती?

Subscribe

दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याचे जाणकार सांगतात. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झालीय. अशा स्थितीत सोने-चांदीच्या किमतींना (Gold Silver Price Update) वाढलेल्या मागणीचा आधार मिळतो. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तसेच मूलभूत गोष्टी मजबूत राहतात.

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरात आज सतत चढ-उतार सुरू आहेत. आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीच्या किमतीत घसरण झालीय. त्याचवेळी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.07 टक्क्यांनी वाढला. चांदी 0.01 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह व्यवहार करत आहे.

सोने 50 हजारांच्या पुढे जाऊ शकते

दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याचे जाणकार सांगतात. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झालीय. अशा स्थितीत सोने-चांदीच्या किमतींना (Gold Silver Price Update) वाढलेल्या मागणीचा आधार मिळतो. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तसेच मूलभूत गोष्टी मजबूत राहतात.

- Advertisement -

सोन्याची किंमत जाणून घ्या

फेब्रुवारीमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 48,185 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे.

चांदीची किंमत

आज सराफा बाजारात चांदीचा भाव वाढत आहे. आज चांदीचा भाव 0.01 टक्क्यांनी घसरून 62,303 रुपये प्रतिकिलो झाला.

- Advertisement -

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवा दर पाहू शकता.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता

आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलेय. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतही तत्काळ माहिती मिळणार आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -