घरदेश-विदेश'या' भारतीय कंपनीने प्राण्यांवर केलेली चाचणी सुरक्षित; अमेरिकन फार्मासह केला करार

‘या’ भारतीय कंपनीने प्राण्यांवर केलेली चाचणी सुरक्षित; अमेरिकन फार्मासह केला करार

Subscribe

संभाव्य लसीचे ५० कोटी पेक्षा जास्त डोस तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य

जगातील सर्वात मोठ्या फॉर्मा कंपन्या कोरोना लस तयार करण्यात सध्या व्यस्त आहेत. आता भारतीय कंपनी Panacea Biotec ने अमेरिकन कंपनी Refana Inc शी हातमिळवणी करून कोरोना विषाणूची लस तयार केली आहे. Panacea Biotec ने एफए आयलिंग नियामकमध्ये या संदर्भातील माहिती दिली आहे. दोन्ही कंपन्यांमधील या भागीदारीने कोरोना व्हायरस आधारित लस तयार करण्याच्या उद्देशाने ही हातमिळवणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय कंपनीला Refana Inc सह कोविड -१९ च्या संभाव्य लसीचे ५० कोटी पेक्षा जास्त डोस तयार करण्याचे लक्ष्य आहे. यासह पुढील वर्षांपर्यंत ४ कोटींपेक्षा जास्त डोस पुरविण्याचे आहे.

यासंदर्भात Panacea Biotec चे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन म्हणाले की, सध्याच्या उत्पादन सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येणारी आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी जगाला सुरक्षित आणि प्रभावी लस आवश्यक आहे. भागीदारीचा एक भाग म्हणून, Panacea Biotec उत्पादन विकास आणि व्यावसायिक निर्मितीसाठी जबाबदार असेल तर संयुक्त उद्यम संस्था क्लिनिकल विकास आणि नियामक सबमिशनवर कार्य करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन कंपन्यांमध्ये या लसीतील ५०-५० ची भागीदारी निश्चित करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्राण्यांवर केलेली चाचणी सुरक्षित

राजेश जैन यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले की, या लसीची चाचणी प्राण्यांवर करण्यात आली आहे, जी आतापर्यंत सुरक्षित आणि प्रभावी देखील ठरली आहे. ते म्हणाले की, ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान औषध चाचणीसाठी मानवी चाचण्यांसाठी अर्ज देखील करण्यात येणार आहे.  Panacea Biotec ची योजना आहे की, मानवी चाचणीचा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनी या लसीचे उत्पादन देखील सुरू करणार आहे. डिसेंबर २० आणि जानेवारी २०२१ मध्ये दरमहा ४० दशलक्ष लस तयार करण्याचे लक्ष्य आहे. या लसीची पुरेसा साठा करण्यापासून ते वाहतुकीची व्यवस्था होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान,या लसीच्या यशानंतर भारतात वापरण्यासाठी तसेच निर्यातीचीही योजना असणार आहे. इतर कंपन्यांनी उत्पादित केलेल्या लसीपेक्षा पूर्णपणे भिन्न आणि त्याचे मिळणारे यश बहुधा अधिक असण्याची शक्यता आहे.


पाकिस्तानात कोरोनाचा कहर; WHOने पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा दिला इशारा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -