घरताज्या घडामोडीParliament session: निलंबित खासदारांचे संसदेबाहेर आंदोलन, जया बच्चन यांनी आंदोलनकर्त्या खासदारांना वाटले...

Parliament session: निलंबित खासदारांचे संसदेबाहेर आंदोलन, जया बच्चन यांनी आंदोलनकर्त्या खासदारांना वाटले चॉकलेट, बिस्किट

Subscribe

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गैरवर्तन केल्यामुळे विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना निलंबित केलं आहे. या १२ खासदारांनी निलंबनाच्या कारवाईविरोधात संसदेबाहेर आंदोलन केलं आहे. महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर खासदारांचे धरणे आंदोलन सुरु आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा खासदारांनी घेतला आहे. आंदोलन करत असणाऱ्या खासदारांना बळ मिळावे यासाठी सपा खासदार जया बच्चन यांनी चॉकलेट आणि बिस्किट दिलं आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान गैरवर्तन केल्यामुळे १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन खासादारांचा समावेश आहे. संसदेच्या परिसरात महात्मा गांधींच्या पुतळ्यामोर खासदारांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलन करणाऱ्या खासदारांना या लढ्यात बळ मिळावे यासाठी सपा खासदार जया बच्चन यांनी त्यांना चॉकलेट, बिस्किट आणि पापडी दिली आहे. यामुळे खासदारांना ऊर्जा मिळेल. खासदार जया बच्चन यांनी खासदारांना खाऊ देताना सांगितले की, हे तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी मदत करेल आणि तुम्ही केंद्र सरकारविरोधात आणखी ऊर्जेने आंदोलन कराल. जया बच्चन यांनी देखील खासदारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

- Advertisement -

त्यांना सुबुद्धी मिळो

खासदारांच्या आंदोलनावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधी खासदारांना सुबुद्धी देवो, जर त्यांना पुन्हा राज्यसभेत यायचे असेल तर त्यांच्या चुकांचा पश्चाताप झाला पाहिजे असे जोशी यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या २ खासदारांसह १२ जणांचे निलंबन

हिवाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळामुळे १२ खासादारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेचे दोन खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई आहेत. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इलामाराम करीम, काँग्रेसच्या फूलदेवी नेताम, छाया वर्मा, रिपुन बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासीर हुसेन, अखिलेश प्रताप सिंग, डोला सेन, तृणमूलच्या शांता छेत्री, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विनय विश्वम अशा एकूण १२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : एअर इंडियानंतर मोदी सरकार विकणार ‘ही’ सरकारी कंपनी, २१० कोटींना डील पक्की


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -