घरदेश-विदेशPatanjali Ayurved Recruitment 2022 : बाबा रामदेव यांच्या कंपनीतील सेल्स विभागात नोकरीची...

Patanjali Ayurved Recruitment 2022 : बाबा रामदेव यांच्या कंपनीतील सेल्स विभागात नोकरीची संधी; असा करा अर्ज

Subscribe

बाबा रामदेव आणि व्यावसायिक आचार्य बालकृष्ण यांच्या पतंजलि कंपनीत अनेक रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना पतंजलिमध्ये नोकरी करण्याची ईच्छा आहे ते यासाठी अर्ज करु शकतात. पतंजलि कंपनीने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, सेल्स टीम आणि मेडिकल टीमसाठी ही भरती प्रक्रिया सुरु होईल. देशातील जिल्हा आणि तहसील स्तरापर्यंत ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. इच्छुक उमेदवार patanjaliayurved.org जात भरतीचे नोटिफिकेशन वाचून अर्ज करु शकतात.

भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती

पतंजलि कंपनीच्या माध्यमातून सेल्स ऑफिसर, एरिया सेल्स मॅनेजर, डीएसएम(सेल्स मॅन) आणि टेरिट्री सेल्स इंचार्ज पदांसाठी ही भरती होणार आहे.

- Advertisement -

१) सेल्स ऑफिसर

पतंजलि आयुर्वेदच्या जाहिरातीनुसार, फूड प्रोडक्ट्स वर्टिकलमध्ये सेल्स ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा उच्च शैक्षणिक संस्थेतून कोणत्याही विषयात डिग्रीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवाराकडे 4 ते 5 वर्षांचा सेल्समधील अनुभव पाहिजे. तसेच एफएमसीजी कंपनीत कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव पाहिजे.

२) एरिया सेल्स मॅनेजर

एरिया सेल्स मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे जवळपास 8 वर्षांचा अनुभव पाहिजे. तर एफएमसीजी कंपनीत कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव हवा.

- Advertisement -

३) सेल्स ऑफिसर (हर्बल कॉस्मेटिक्स)

हर्बल कॉस्मेटिक्स डिव्हिजनमधील सेल्स ऑफिसर पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले उमेदवार अर्ज करु शकतात. याशिवाय सेल्समध्ये 5 वर्षांचा अनुभव हवा. तसेच उमेदवाराचे वय 25 ते 35 च्या दरम्यान असले पाहिजे.

४) डीएसएम (सेल्स मॅन)

मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार डीएसएम (सेल्स मॅन) पदासाठी अर्ज करु शकतात. मात्र उमेदवाराचे वय 25 ते 35 दरम्यान असले पाहिजे. तसेच कामाचा 2 – 3 वर्षांचा अनुभव पाहिजे.

५) टेरिट्री सेल्स मॅनेजर

टेरिट्री सेल्स मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण करण्याबरोबरचं 3 ते 4 वर्षांचा कामाचा अनुभव पाहिजे.

असा करा अर्ज

उमेदवार वरील पदांसाठी foodsales@patanjaliayurved .org आणि patanjaliherbalcosmetics@ patanjaliayurved .org अर्ज करु शकतात.


सकाळी उठल्यानंतर चुकूनही करुन नका या 5 चुका; आरोग्यावर होईल वाईट परिणाम


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -