घरदेश-विदेशCorona: लोकांनी दिल्लीबाहेर जाऊ नये, म्हणून चक्क रस्तेच खोदून ठेवले!

Corona: लोकांनी दिल्लीबाहेर जाऊ नये, म्हणून चक्क रस्तेच खोदून ठेवले!

Subscribe

विनाकारण भटकणाऱ्या लोकांना लगाम लावण्यासाठी चक्क दिल्ली हरियाणा सीमेवर रस्ते खोदण्यात आले.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी दिल्ली हरियाणा सीमेवर बुधवारी वेगळेच चित्र समोर आले. लॉकडाऊन दरम्यान विनाकारण भटकणाऱ्या लोकांना लगाम लावण्यासाठी चक्क दिल्ली हरियाणा सीमेवर रस्ते खोदून ठेवले तर काही मार्गांवर फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. बुधवारी हरियाणातील नजफगढ़ला लागून असलेल्या गावातील काही रस्ते हरियाणा सरकारकडून खोदण्यात आले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान बुलडोझर येऊन गावातील रस्ते खोदण्यात आले. दिल्लीतील लोकांनी हरियाणामध्ये प्रवेश करू नये, तसेच हा रस्ता लोकं वाहतुकीसाठी वापरु नये, तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

हरियाणाच्या सर्व सीमा सील

हरियाणाने दिल्लीबरोबरच्या सर्व सीमांवरही बंद केल्या आहेत. हरियाणातील चार जिल्ह्यांच्या प्रवेश सीमा पुर्णतः बंद केल्याने फरीदाबाद, गुरुग्राम, सोनीपत आणि झज्जर जिल्ह्यांसह दिल्लीला जोडणाऱ्या १८ रस्त्यांवर वाहतुक बंद असल्याने शांतता पसरली आहे.

- Advertisement -

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश

दुसरीकडे दिल्ली-गुरुग्राम सीमेवर देखील परिणाम झाला. दिल्लीहून गुरुग्रामला जाणाऱ्या बऱ्याच लोकांना परत फिरावे लागत आहे. दिल्ली फरीदाबाद सीमेवरही बुधवारी दुपारी १२ नंतर कोणत्याही वाहनाला प्रवेश देण्यात आला नसून केंद्र सरकारच्या पासशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. तर फक्त अत्यावश्यक वस्तू असलेल्या वाहनांना केवळ सूट देण्यात आली.


महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होईल : शरद पवार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -