घरताज्या घडामोडीदारु पिण्यासाठी महापौरांनी केले लॉकडाऊनचे उल्लंघन; पोलिसांच्या भीतीने शवपेटीत झोपला

दारु पिण्यासाठी महापौरांनी केले लॉकडाऊनचे उल्लंघन; पोलिसांच्या भीतीने शवपेटीत झोपला

Subscribe

दारु पिण्यासाठी महापौरांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

जगात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या लॉकडाऊनचे एका महापौरांने दारु पिण्यासाठी उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिसांना पाहताच आपल्यावर कारवाई होऊ नये, म्हणून या व्यक्तीने चक्क शवपेटीमध्ये उडी मारत मृत असल्याचे नाटक केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात इव्हिनिंग स्टॅडर्ट या वेबसाईटने माहिती दिली आहे.

पोलिसांपासून वाचण्यासाठी शवपेटीत झोपला

पेरु देशामधील तंतारा शहरात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. जॅमी रोनाल्डो उर्बीना टॉरेस असे या महापौराचे नाव असून सध्या सोशल मीडियावर शवपेटीमध्ये झोपलेल्या जॅमी यांचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच अनेकांनी ट्विटरवरुन तो फोटो शेअर देखील केला आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

या महापौराने आपल्या मित्रांबरोबर मद्यप्राशन करण्यासाठी घराबाहेर पडत त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दाखल झाले. मात्र, पोलिसांपासून वाचण्यासाठी पोलिसांना पाहताच क्षणी जॅमीने शवपेटीत उडी घेत झोपल्याचे नाटक केले. या घटनेनंतर सर्व स्तरातून महापौरावर टीका होत आहे.

- Advertisement -

पोलिसांनी घेतले ताब्यात

स्थानिक पसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी जॅमी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात महापौराच्या कारनाम्याची चर्चा सुरु असून महापौरांविरोधात तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. कोरोनाची साथ पसरल्यापासून जॅमी केवळ आठ दिवस शहरामध्ये होते असे, सांगण्यात येत आहे. या कालावधीमध्ये शहरांमधील बेघरांसाठी महापौरांनी काहीच केले नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.


हेही वाचा – तीन भावांनी घेतला स्पायडरमॅन बनण्याचा ध्यास; केले ‘हे’ विचित्र कृत्य


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -