घरCORONA UPDATEपुन्हा पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ, 'हा' आहे आजचा भाव!

पुन्हा पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ, ‘हा’ आहे आजचा भाव!

Subscribe

तब्बल ८३ दिवसांनंतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली होती.

गेल्या काही दिवसात पेट्रोलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज शनिवारी शहरात पेट्रोल प्रती लीटर ८२.१० रुपये झाला आहे. डिझेलच्या दरात वाढ झाली. डिझेल ७२.०३ रुपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ७५.१६ रुपये झाला असून डिझेलसाठी ७३.३९ रुपये आहे.

गेल्या सहा दिवसांत पेट्रोल ३.९० रुपयांनी महागले आहे. डिझेलच्या किमती सरासरी ४ रुपये प्रती लीटरने वाढल्या आहेत. कोरोनाची पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन आढावा बंद केला होता. जागतिक बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाचा भाव १ टक्क्याने वधारला आणि ३८.९४ डॉलर प्रती बॅरल झाला.

- Advertisement -

तब्बल ८३ दिवसांनंतर रविवारी प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली होती. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठी घसरण झाली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उणे स्तर गाठला होता. त्यामुळे कमॉडिटी बाजारात खळबळ उडाली होती. तेलाची साठवणूक परवडत नसल्याने तेलाच्या किमती गडगडल्या होत्या. सध्या कच्च्या तेलाच्या किमती ४० डॉलरच्या आसपास आहेत.

दिल्लीत पेट्रोल ५९ पैसे आणि डिझेल ५८ पैशांनी महागले आहे. कोलकात्यात पेट्रोल ७७.०५ रुपये असून डिझेल ६९.२३ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ४६ पैशांनी महागले आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर ७८.९९ रुपये असून डिझेल ७१.६४ रुपये आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – पुन्हा लॉकडाऊन ही अफवाच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -