घरताज्या घडामोडीयुद्धसराव थांबवा नाहीतर... फिलिपिन्सचा चीनला इशारा

युद्धसराव थांबवा नाहीतर… फिलिपिन्सचा चीनला इशारा

Subscribe

संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणाऱ्या चीनविरोधात जगभरात संताप व्यक्त होत आहे. त्यातच चीनने शेजारील देशांच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर चीन दक्षिण चीन महासागरात युद्धसराव सुरू केला आहे. यामुळे युद्धसराव थांबवा नाहीतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा फिलिपिन्सने चीनला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी लेहमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. त्यानंतर चीनने इतर देशांवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली असून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पेरासेल बेटाजवळ यु्द्धाभ्यास करत आहे. तसेच पेरासेलवरून जाणारे पाणीही अडवण्यात आलं आहे. व्हिएतनाममधील औषध कंपन्या हे पाणी वापरतात. यामुळे फिलिपाईन्सचे परराष्ट्र सचिव तियोदोरो लोक्सिन ज्युनियर यांनी चीनला हा युद्धसराव थांबवण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -