घरअर्थजगतबेरोजगारांसाठी खुशखबर! PhonePe देणार ७०० जणांना नोकरी

बेरोजगारांसाठी खुशखबर! PhonePe देणार ७०० जणांना नोकरी

Subscribe

वॉलमार्टच्या मालकीची ऑनलाईन पेमेंट कंपनी फोन पे कंपनीचा परीघ वाढवण्यासाठी नोकरभरती सुरु करणार आहे. येणाऱ्या महिन्यांत ७०० पदांवर नोकरी भरती होणार आहे. २०१५ मध्ये स्थापन झालेल्या बंगळुरू स्थित कंपनी आपला सध्याचा व्यवसाय वाढविण्यासाठी तसेच स्वतःला स्पर्धेत पुढे ठेवण्यासाठी भरती करण्यात येणार आहे. कोरोच्या काळात अनेक लोक पेमेंट करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करत आहेत.

फोनपेचे मुख्य अधिकारी मनमीत संधू म्हणाले की आम्ही ७०० हून अधिक रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही आमचे व्यवसायीक धोरण आणि आवश्यकतांनुसार काम करीत आहोत. ग्रामीण भागात नेटवर्क वाढविण्याची कंपनीची योजना आहे. रिक्त पदे विविध पदांसाठी आहेत. कंपनी अभियंता शोधत आहे तसेच व्यवसाय विकास, उत्पादन व्यवस्थापन आणि व्यवसाय संपादनामध्ये गुंतलेली आहे. आमच्याकडे फोनपे च्या विपणन (मार्केटिंग), वित्त आणि कायदेशीर टीमसाठी रिक्त पदे देखील आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊन दरम्यान अनेक कंपन्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मार्च २०२० पासून फोनपेने ५०० लोकांची नेमणूक केली असून एकूण कामगार संख्या २,२०० वर गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी कंपनीने २०२१ च्या अखेरीस आपले ऑफलाइन व्यापारी नेटवर्क २ कोटी ५० लाख पर्यंत वाढवण्याचा आपला हेतू जाहीर केला होता. आतापर्यंत, फोनपे ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात १ कोटी ३० लाख ऑफलाइन व्यापार्‍यांना सेवा पुरविते. संधू म्हणाले, “यातून ५,५००० तालुक्यात १०,००० रोजगार निर्माण होतील”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -