घरदेश-विदेशPM kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांनो महिन्याभरात ही काम पूर्ण करा; ...

PM kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांनो महिन्याभरात ही काम पूर्ण करा; होळीनंतर खात्यात जमा होतील 4000 रुपये

Subscribe

PM kisan Samman Nidhi : शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये थेट पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाऊंटमध्ये दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करते.

आत्तापर्यंत या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये सरकारने 10 हप्त्यांमध्ये पैसे पाठवले आहेत.
त्याचा पुढील हप्ता एप्रिल महिन्यात येणे अपेक्षित आहे. मात्र आता नवीन नियमांनुसार ई-केवायसी करणे आवश्यक असणार आहे. तसे न केल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.

- Advertisement -

ई-केवायसी आजचं करा पूर्ण

अशा परिस्थितीत, तुम्हाला 11 व्या हप्त्यासाठी पैसे मिळवायचे असतील, तर 31 मार्च 2022 पूर्वी ई-केवायसी (PM Kisan Yojana E-KYC) पूर्ण करा. अन्यथा, त्याशिवाय एप्रिल-जुलैचा 2000 रुपयांचा हप्ता अकाऊंटमध्ये जमा होणार नाही. शेतकरी स्वतःही ई-केवायसी करू शकतात. जर मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल, तर पीएम-किसानच्या वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसीचा पर्याय निवडावा लागेल. पोर्टलवर त्यांच्याकडून आधार क्रमांक विचारला जाईल. पोर्टलवर दिसणारा इमेज टेक्सट भरल्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर Get OTP वर क्लिक करा. शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल, जो पोर्टलवर भरला जाईल आणि सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल. जर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल, तर त्याला जन सुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करून घ्यावे लागेल.

- Advertisement -

4,000 रुपयांचा फायदा कोणाला?

नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2022 रोजी या योजनेच्या 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले. आता लवकरच PM किसान योजनेअंतर्गत 11 वा हप्ता येणार आहे. अशा परिस्थितीत, योजनेच्या लाभार्थ्यांना एक विशेष संधी आहे आणि त्यांना यावेळी 4000 रुपये मिळू शकतात. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, परंतु अद्याप अर्ज करू शकलेले नाहीत, त्यांना ही संधी दिली जाईल. जर नवीन शेतकऱ्यांनी 31 मार्च 2022 पूर्वी PM किसान योजनेसाठी स्वतःची नोंदणी केली तर त्यांना दोन हप्त्यांचे पैसे मिळतील. म्हणजेच 11व्या हप्त्यासोबत दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये जोडून त्यांना एकूण 4,000 रुपये मिळू शकतात.


ukraine russia war : युक्रेनच्या बाजूने लढण्यासाठी जगभरातील तब्बल 16,000 स्वयंसेवकांचा अर्ज, युक्रेनियन महिलांनीही घेतली हातात शस्त्रे

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -