घरताज्या घडामोडीPM Kisan Yojana : नवीन वर्षात शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, पीएम किसान...

PM Kisan Yojana : नवीन वर्षात शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, पीएम किसान योजनेचा १० वा हप्ता होणार जारी

Subscribe

नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. आगामी वर्षातील जानेवारी २०२२ महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १० वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. कृषी मंत्रालयात जवळपास तयारी करण्यात आली आहे. तब्बल २२ कोटी रूपयांची रक्कम असू शकते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही अशी पहिली योजना आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. देशातील जवळपास ११ कोटी शेतकऱ्यांना १.६१ लाख कोटी रूपयांची रक्कम जारी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

पीएम किसान सन्मान योजनेचे ९ हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत. मात्र, आता आगामी वर्षातील पहिल्या महिन्यात २००० रूपयांचा १० वा हप्ता शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून जारी केला जाणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर यांच्या वतीने सांगण्यात आलं की, पीएम मोदी १ जानेवारी २०२२ रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत पहिला हप्ता जारी करणार आहेत. तसेच शेतकरी उत्पादक संघटनांसाठी इक्विटी अनुदान जारी करणार आहेत. या कार्यक्रमात pmindiawbcast.nic.in द्वारे सहभागी होऊ शकतात किंवा दूरदर्शनद्वारेही सहभागी होऊ शकतात.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षीक सहा हजार रूपये थेट आर्थिक सहाय्य म्हणून हस्तांतरित करते. ही रक्कम २ हजारांच्या रूपयांच्या हप्त्यांमध्ये दर तिसऱ्या महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना ९ हप्ते जारी करण्यात आले असून १० वा हप्ता १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.


हेही वाचा : सरसकट शाळा बंद होणार असं कुठलंही विधान केलेलं नाही – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -