घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांसाठी परदेश दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशिया या दक्षिण आशियाई देशांचा समावेश आहे. दक्षिण आशियाई देशांशी चालणाऱ्या व्यापार प्रबळ करण्यासाठी मोदींनी ‘अॅक्ट ईस्ट नीती’ची स्थापना केली होती. याच ‘अॅक्ट ईस्ट नीती’च्या धोरणाला चालना देण्यासाठी मोदी परदेश दौऱ्यावर जात आहेत.

दक्षिण आशियाई देशाशीं संबंध दृढ होतील
परदेश दौऱ्यावर जाण्याअगोदर सोमवारी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, “या दौऱ्यामुळे भारताचे दक्षिण आशियाई देशांशी घनिष्ठ संबंध तयार होतील.” त्याचबरोबर राजनैतिक विश्लेषकांनीही ही गोष्ट मानली आहे की, मोदींच्या परदेश दौऱ्याने दक्षिण आशियाई देशांशी आपले संबंध दृढ होतील.

- Advertisement -

सिंगापूरमध्ये क्षेत्रीय सुरक्षा मुदद्यावर मोदींना विचार मांडण्याची संधी
सिंगापूरमध्ये एक सुरक्षा स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाविषयी मोदी म्हणाले की, ”या संमेलनाला पहिल्यांदा देशाचा तरी पंतप्रधान हजर राहणार आहे. त्याचबरोबर क्षेत्रीय सुरक्षेच्या मुदद्यावरती भारताचे विचार मांडण्याची संधी भारताला मिळाली आहे.”

कसा असेल दौरा?
मोदी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्या निमंत्रणानुसार आज जाकार्ताला जाणार आहेत. ३० तारखेला त्यांचे राष्ट्रध्यक्षांसोबत व्यापारासंबंधित विषयांवर चर्चा होईल. ३१ मे ला सिंगापूरला जाण्याआधी पंतप्रधान मलेशियाला जातील. तिथे ते महातीर मोहम्मद यांची भेट घेतील. त्यानंतर १ जूनला सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष हलीमा याकूब यांची भेट घेऊन व्यापाराशी संबंधित विषयांवर चर्चा करणार आहेत.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -