PM Modi Meeting: कोरोना स्थितीवर पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

देशात देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढ असताना आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांवरील रुग्णांना लसींचा बुस्टर डोस देण्याची मोहीम देशात सुरू झाली आहे.

Mumbai high-rise fire PM Modi announces Rs 2 lakh ex gratia Maharashtra govt grants Rs 5 lakh
'कमला' इमारत आग दुर्घटना : पंतप्रधान मोदींकडून PMNRF मधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत

देशातील वाढत्या कोरोना स्थितीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. पंतप्रधान आज (गुरुवारी) दुपारी 4.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी होणार आहेत. आजारपणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच या बैठकीत सहभागी होणार आहेत.

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतेय. यामुळे राज्यांकडून विविध निर्बंध लादले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. दरम्यान पंतप्रधानांनी रविवारी देशातील कोरोनाची परिस्थिती, आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि पुरवठा, देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती, ओमायक्रॉनचा वाढता प्रसार याचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली होती.

यावेळी पंतप्रधानांनी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि मिशन मोडवर प्रौढांसाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. त्याचवेळी, राज्यांची परिस्थिती, तयारी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली जाईल, असे त्यांनी सांगितले होते.

देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढ असताना आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांवरील रुग्णांना लसींचा बुस्टर डोस देण्याची मोहीम देशात सुरू झाली आहे. कारण कोरोनाविरोधात लढ्यासाठी देशात लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे यावर पंतप्रधान मोदी अनेकदा सांगितले आहे. 2020 मध्ये साथीचा रोग सुरू झाल्यापासून त्यांनी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.


PM Awards : PMO ने योजना सुधारणांना दिली मंजुरी; ‘या’ चार योजनांवर सरकारचे लक्ष