घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींचा पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना फोन, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

पंतप्रधान मोदींचा पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना फोन, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यपदी नवी जबाबदारी सांभाळणाऱ्या जो बायडन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच सोमवारी रात्री उशिरा संवा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या संभाषणाची माहिती स्वतःच जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये प्रादेशिक मुद्दे आणि हवामान बदलावर दोन्ही राष्ट्र एकमेकांना सहकार्य करतील असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यपदी मिळवलेल्या यशाबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Pm Narendra Modi had a telephonic discussion with American president Joe Biden first time)

- Advertisement -

इंडो पॅसिफिक प्रदेशात आणि त्यापलिकडील प्रदेशातही शांततेच्या दृष्टीने आणि सुरक्षेच्या मुद्दावर रणनिती निश्चित करतानाच आम्ही भागीदारी बळकट करण्यास उत्सुक आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. याआधी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन यांच्या निवडीनंतर पंतप्रधानांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. अमेरिकेकन राष्ट्राध्यक्षप्रमुख म्हणून २० जानेवारी रोजी जो बायडन यांनी जबाबदारी स्विकारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दोन्ही देश सामान्य आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र उभे आहेत असे स्पष्ट केले होते. भारताचे आणि अमेरिकतले संबंध हे सामायिक मूल्यांवर आधारलेले आहेत. तसेच दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असतानाच आर्थिक संबंधही वाढणारेच आहेत. दोन्ही देशांमध्ये बहुपक्षीय अजेंडा असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -