घरट्रेंडिंगभाजी विकणाऱ्या पठ्याने UPSC परीक्षेत पटकावला ८वा क्रमांक

भाजी विकणाऱ्या पठ्याने UPSC परीक्षेत पटकावला ८वा क्रमांक

Subscribe

आई-वडिलांसोबत डोक्यावर पाठी घेऊन भाजी विकरणाऱ्या तरुणांने युपीएसी परीक्षेत देशात आठवे स्थान पटकावले आहे.

जिद्द, चिकाटी आणि हुशारी असेल तर काहीही शक्य करता येते. मग, ती व्यक्ती कोणतीही अशक्य गोष्टही शक्य करु शकते. अशीच एक गोष्ट एका पठ्याने शक्य करुन दाखवली आहे. आई-वडिलांसोबत शेतात काम करणाऱ्या आणि डोक्यावर भाजीची पाटी ठेऊन भाजी विकणाऱ्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज करत त्यांची मान उंचावली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका पठ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात आठवा क्रमांक पटकावत आपल्या आई-वडिलांचे नाव कमावले आहे. शरण गोपीनाथ कांबळे, असे या पठ्याचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे गावात राहणाऱ्या शरणने २०१९ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए) परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये शरणला घवघवीत यश मिळाले आहे. आई-वडिलांसोबत डोक्यावर पाटी ठेऊन भाजी विकणारा शरण अहोरात्र मेहनत घेत होता. तसेच आपल्या आई-वडिलांना देखील त्यांच्या कामात मदत करायचा. तसेच मुलाला अधिकारी बनविण्यासाठी अहोरात्र मजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी कष्टाचे सार्थक झाल्याचे सांगत आनंद व्यक्त केला आहे.

शरण कांबळेविषयी…

तडवळे येथे राहणाऱ्या शरण कांबळे यांच्या वडिलांची केवळ दीड एकर शेती आहे. तर घरी आई, वडिल, मोठा भाऊ आणि शरण हे कुटुंब राहते. दोन मुलांपैकी मोठा मुलगा दादासाहेब अभियंता झाला आहे. तर लहान मुलगा अभियंता पदाची पदवी घेऊन परीक्षेचा अभ्यास करत होता. शरणचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तडवळे येथील यशवंतराव चव्हाण प्रशालेत, बारावीचे शिक्षण वैरागच्या विद्या मंदिरात आणि २०१६ साली सांगली येथील वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग येथे बी टेक चे शिक्षण पूर्ण केले आहे. तर २०१८ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगरुर येथून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी या विषयाची पदवी घेतली आहे. विषेश म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शरणला एका कंपनीमध्ये तब्बल २० लाखांच्या पॅकेजची नोकरी आली होती. पण, आई-वडिलांच्या कष्टाचे चीज व्हावे म्हणून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी १८ ते २० तास मेहनत घेऊन परीक्षा दिली आणि आता त्याच्या या मेहनतीला यश आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिक पुन्हा गारेगार, पारा ९.२ अंशावर


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -