घरदेश-विदेशकोरोनाचा हाहाकार; जगभरातील बाधितांचा आकडा १ कोटीपार!

कोरोनाचा हाहाकार; जगभरातील बाधितांचा आकडा १ कोटीपार!

Subscribe

कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर

जगात कोरोना व्हायरसचे थैमान सुरूच आहे. जगातील २१३ देशांत कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जगात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही एक कोटींहून अधिक झाली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना व्हायरसची लागण १ कोटी ८६ हजार ९६९ लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या ५ लाख १ हजार ३९३ झाली आहे. दिलासादायक म्हणजे जगभरात ५४ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले असून कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे.

भारत जगात चौथ्या क्रमांकावर

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात कोरोनाचे ५ लाख २९ हजार ५७७ रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे १६ हजारांहून अधिकांचे बळी गेले आहेत. सध्या भारतात २ लाख ३ हजार ३२८ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख १० हजार १४६ जण बरे झाले आहेत.

- Advertisement -

सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत २५ लाख ९६ हजार ४०३जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १ लाख २८ हजार १५२ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून १३ लाख १५ हजार ९४१ कोरोनाबाधित आहेत तर ५७ हजार १०३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत ४१० लोकांना मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या कोरोना विषाणूच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ५ लाख २८ हजार ८५९ लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. तर आतापर्यंत, ३ लाख ९ हजार ७१३ लोक उपचार करून बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाने १६ हजार ९५ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितेल जात आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण २ लाख ३ हजार ५१ कोरोना अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर गेल्या २४ तासांत एकूण ४१० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून कोरोना व्हायरची लागण झालेल्या १९ हजार ९०६ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.


देशात कोरोनाचा कहर; एका दिवसात ४१० जणांचा बळी, १९ हजारांहून अधिकांना संसर्ग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -