घरअर्थजगतमोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या इंटरकनेक्टेड इमारतीचे लोकार्पण; 15 मजली 9...

मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या इंटरकनेक्टेड इमारतीचे लोकार्पण; 15 मजली 9 टॉवर, 4500 हून अधिक कार्यालय

Subscribe

सूरत – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) गुजरातमधील सूरत डायमंड बोर्स (SDB) इमारतीचे लोकार्पण केले. ही सर्वात मोठी इंटरकनेक्टेड आणि अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटागॉन पेक्षा मोठी कार्यालयीन इमारत आहे. यामध्ये 4500 हून अधिक ऑफिस आहेत. या इमारतीच्या लोकार्पणाआधी पंतप्रधानांच्या हस्ते सूरत विमानतळावरील इंटीग्रेटेड टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे, त्यानंतर रोड शो देखील झाला.

डायमंड इंडस्ट्रीचे मॅन्यूफॅक्चरिंग हब

सध्या येथे 135 कार्यालयातून कामकाजाला सुरुवात झाली आहे. त्यातील 26 कंपन्या या मुंबईतून सूरतला स्थलांतरित झाल्या आहेत. देशातील हा आता सर्वात मोठा बोर्स असणार आहे. ही इमारतीही वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ही इमारत पाहाण्यासाठी देखील सूरतला यायला हवे असे त्यांचे म्हणणे आहे.
मॅन्यूफॅक्चरिंग आणि ट्रेडर्स हे एकाच छताखाली येथे आले आहेत. एका हिरे व्यापाऱ्याने सांगतिले की, सूरत हे मॅन्यूफॅक्चरिंग हब आहे आम्ही मॅन्यूफॅक्चरिंग करतो. येथे ट्रेडर्स देखील आहेत. त्यामुळे ट्रेडर्ससोबत थेट संवाद साधता येतो.

- Advertisement -

अमेरिकेच्या पेंटागॉनपेक्षाही मोठी इमारत

सूरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात जास्त कार्यालय असलेली इमारत मानली जात आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनमध्येही 983 कार्यालय नाहीत.
आकाराच्या हिशेबाने पाहिल्यास 15 मजली ही इमारत 66 लाख स्केअर फूटांमध्ये पसरलेली आहे. एकूण 33 एकर क्षेत्रामध्ये ही इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी सूरतमधील 4200 हिरे व्यापारी एकत्र आल्याचे सांगितले जात आहे. पाच वर्षांत तयार झालेल्या या इमारतीवर जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 15 मजली या इमारतीमध्ये 9 कॉम्प्लेक्स आहेत.

गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये इमारतीचा समावेश

इमारतीच्या लोकार्पणापूर्वीच तिची ख्याती जगभर झाली आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या इमारतीचा समावेश करण्यात आला आहे. 33 एकरातली या इमारतीमध्ये ऑफिसेस, डायमंड बोर्स, कॅम्पसमध्ये सेफ डिपॉझिट वॉल्ट, कॉन्फ्रेंन्स हॉल, मल्टिपर्पज हॉल, हॉटेल, बँक, कन्व्हेंशन सेंटर, एग्जिबिशन सेंटर्स, ट्रेनिंग सेंटर्स, एंटरटेनमेंट एरिया अशा वैविध्यपूर्ण सुविधा आहेत.

- Advertisement -

काही महिन्यापूर्वीच डायमंड कंपन्यांनी त्यांचे कार्यालय येथे थाटले आहेत. मुंबईतून 135 पैकी 26 व्यापाऱ्यांनी मुंबईतून सूरतमध्ये स्थलांतरही केले आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र काँग्रेस कडून टीकाही केली जात आहे. शरद पवार यांनीही सूरतमध्ये झालेल्या या बोर्समध्ये मुंबईतील व्यापाऱ्यांच्या स्थलांतरावर टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -