घरअर्थजगतNarendra Modi यांच्या गॅरंटीचे उदाहरण सूरत डायमंड बोर्स; गुजरातमध्ये पंतप्रधानांचा हुंकार

Narendra Modi यांच्या गॅरंटीचे उदाहरण सूरत डायमंड बोर्स; गुजरातमध्ये पंतप्रधानांचा हुंकार

Subscribe

सूरत – येथील डायमंड बोर्सच्या लोकार्पण सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘ही मोदींची गॅरंटी आहे. आज सूरत शहराच्या वैभवात आणखी एक हिरा विराजमान झाला आहे. तोही छोटा-मोठा हिरा नाही तर, तर जगातील सर्वोश्रेष्ठ आहे.’

पंतप्रधान म्हणाले, “आता जगात कोणीही डायमंड बोर्सचे नाव घेतले तर त्यासोबत सूरतचे नाव जोडले जाणार आहे. भारताचे नाव घ्यावे लागणार आहे. सूरत डायमंड बोर्स हे भारतीय डिझाइन, भारतीय डिझायनर्स, भारतीय मटेरियल आणि भारतीय कॉन्सेप्ट यातील सामर्थ्य दाखवते. ही इमारत भारताच्या नव्या सामर्थ्याचे आणि संकल्पाचे प्रतिक आहे.”

- Advertisement -

नरेंद्र मोदी म्हणाले, आज सूरत डायमंड बोर्सच्या निमित्ताने गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेड सेंटर तयार झाले आहे. रॉ डायमंड असेल, पॉलिश्ड डायमंड असेल, लॅब ग्रोन डायमंड किंवा दागिने, हे सर्व आता एकाच छताखाली मिळणे संभव झाले आहे. कामगार, कारागिर, व्यापारी सर्वांसाठी सूरत डायमंड बोर्स वन स्टॉप सेंटर झाले आहे.

आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातावरण भारताच्या बाजूने आहे. संपूर्ण जगात भारताची चलती आहे. जगभरात भारताची चर्चा होत आहे. मेक इन इंडिया हा सशक्त ब्रँड झाला आहे, भारताबद्दल असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.

- Advertisement -
सुरत ही जगाची रत्नांची राजधानी म्हणून ओळखली जाते, जिथे जगातील 90% हिरे कापले जातात. 65,000 हून अधिक हिरे व्यावसायिक नव्याने तयार झालेल्या सूरत डायमंड बाजारामध्ये एकत्र काम करू शकतील.

ते म्हणाले, आज हे शहर जगातील वेगाने वाढणाऱ्या पहिल्या दहा शहरांपैकी एक आहे. सूरतचे स्ट्रिट फूड, स्वच्छता, स्किल डेव्हलपमेंट सर्वकाही अव्वल दर्जाचे आहे. कधीकाळी सूरतची ओळख सनसिटी होती, येथील लोकांच्या कष्टाने, मेहनतीने या शहराला डायमंड सिटी बनवले आहे. सिल्क सिटी बनवले आहे. तुम्ही सर्वांनी आणखी मेहनत केली तर सूरत ड्रिम सिटी बनेल. आता सूरत आयटी क्षेत्रातही अग्रेसर होत आहे. सर्वच बाजूने विकसित होणाऱ्या शहराला सूरत डायमंड बोर्स मिळाले आहे. तुम्ही सर्व सध्या मोदींची गॅरंटीबद्दल ऐकत असाल. सूरतच्या जनतेला मोदीच्या गॅरंटीची ओळख आधीपासून आहे. येथील महेनती लोकांनी मोदीच्या गॅरंटीला सत्यात उतरताना पाहिले आहे. सूरत डायमंड बोर्स हीच गॅरंटी आहे.


हेही वाचा : मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या इंटरकनेक्टेड इमारतीचे लोकार्पण; 15 मजली 9 टॉवर, 4500 हून अधिक कार्यालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -