घरताज्या घडामोडीPawankhind Film : इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक! 'पावनखिंड'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Pawankhind Film : इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक! ‘पावनखिंड’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

भिनेते चिन्मय मांडलेकर,अजय पूरकर, अंकित मोहन, शिवराज वायचळ, मृणाल कुलकर्णी, प्राजक्त माळी, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी,माधवी निमकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Pawankhind Film Trailer : फर्जंद आणि फत्तेशिकस्त या सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा पावनखिंड या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिनेमाची चर्चा आहे. अखेर सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभूतपूर्व कारकिर्दीतील त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या शिवराज अष्टका’तील ‘पावनखिंड’ हे तिसरं पुष्प आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या रक्ताने इतिहासाच्या विजयी पराक्रमाचे पान पावनखिंड या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. कोरोना काळात लांबणीवर पडलेल्या सिनेमांपैकी पावनखिंड हा सिनेमा असून अखेर येत्या १८ फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

- Advertisement -

सिनेमात अभिनेते चिन्मय मांडलेकर,अजय पूरकर, अंकित मोहन, शिवराज वायचळ, मृणाल कुलकर्णी, प्राजक्त माळी, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी,माधवी निमकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ! इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक,
सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेलर! हर हर महादेव, असे म्हणत सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सिनेमाच्या ट्रेलरचे पोस्टर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

- Advertisement -

एक थरारक रंजक अलढाईचा प्रवास आपल्याला ट्रेलरमधून पहायला मिळतोय. ट्रेलर मधले विज्युअल्य इतके सुंदर आहेत कि आपण एखादा प्रसंग प्रत्यक्षात पाहतोय असा भास होतो. बॅकग्राऊंड स्कोर चा परिणाम चित्रीकरणात दृश्यावर योग्य पद्धतीने बसलाय. चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज तर हुबेहूब वाटत आहेत . त्यांचा तो भारदस्त आवाज आणि रयतेसाठी असलेली कळवळ त्यांनी डोळ्यांतून परिणामकारक पद्धतीने दाखवली आहे . त्यात प्राजक्ता माळीची एका दुखद प्रसंगी मारलेली आर्त हाक काळजाला भिडतेय. मृणाल कुलकर्णी यांना आपण या आधी सुद्धा अनेक वेळा ऐतिहासिक भूमिकांमधून पाहिले आहे . या वेळी सुद्धा त्यांनी आपल्या वाट्याला आलेली राजमाता जिजाऊंची भूमिका उत्तम वठवली आहे.


हेही वाचा –  Chandramukhi : ‘चंद्रमुखी’च्या घुंगरांचा आवाज 29 एप्रिलपासून सर्वत्र घुमणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -