घरदेश-विदेशPOK आहे दोन देशांमधील काश्मीर वादाचा भळभळता मुद्दा

POK आहे दोन देशांमधील काश्मीर वादाचा भळभळता मुद्दा

Subscribe

भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर मुद्द्यावरुन नेहमीच तणाव राहिलेला आहे. या तणावाचे मुख्य कारण आहे पीओके. या पीओके विषयी आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

POK (Pak Occupied Kashmir) म्हणजेच पाकिस्तानच्या हद्दीतील काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वादाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश हा भाग आपल्या हद्दीत असल्याचा दावा करतात. त्यामुळे हा विषय गेल्या काही दशकांपासून भळभळता राहिलेला आहे. या भागाला ‘आझाद काश्मीर’ म्हणून देखील ओळखले जाते. मात्र, नावानुसार हा भाग आझाद नाही. या भागावर पाकिस्तानची सत्ता आहे. या भागात अनेक दहशतवाद्यांची तळे आहेत. तिथे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. पाकिस्तान या दहशतवाद्यांचे समर्थन करतो आणि तिथे कोणत्याही दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे नाहीत, अशी खोटी माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगतो. दहशतवाद्यांची तळे ही भारत-पाकिस्तानच्या सीमारेषा भागेजवळ आहेत. त्यापलीकडे मोठी वस्ती आहे. तिथे ३० लाख लोक वास्तव्यास आहेत.

जम्मू-काश्मीर पेक्षा तीन पटीने मोठा आहे आझाद काश्मीर

पीओकेचे क्षेत्रफळ हे जम्मू-काश्मीरपेक्षा तीन पटीने मोठे आहे. पीओकेचे एकूण १३ हजार किलोमीटर क्षेत्रफळ आहे. या भागात एकूण ३० लाख नागरिक राहतात. पाकिस्तानची या भागात सत्ता आहे. मात्र, पाकिस्तान या भागाचा विकास करण्याऐवजी या भागातील तरुणांमध्ये भारताविरोधात माहिती देऊन भडकवण्याची कामे करतो. पाकिस्तान या भागातील नागरिकांना दहशतवादाचे प्रशिक्षण देते. भारतात मुंबई २६/११ हल्ल्याचा दहशतवादी अजमल कसाबचे या भागातील मुजफ्फराबाद येथे प्रशिक्षण झाले होते.

- Advertisement -

कसा बनला POK प्रदेश?

काश्मीर भारतात सामील झाल्यापासून तो विषय अजूनही भळभळता राहिलेला आहे. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काश्मीर कोणत्या देशात जाणार? यासंदर्भात चर्चा सुरु होती. काश्मीरचे राजा हरि सिंह यांनी याविषयावर निर्णय घेण्यास विलंब लावला. निसर्ग सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर हे फार मोठे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे काश्मीरचा एक विभक्त असा देश निर्माण करण्याचा प्रयत्न राजा हरि सिंह यांचा होता. मात्र, त्यांचे ते विचार अयशस्वी ठरले. कारण पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. त्यामुळे सुरक्षेसाठी राजा हरि सिंह यांनी भारताची मदत मागितली. यावेळी भारताने राजा हरि सिंह यांच्यासोबत करार केला. या करारमध्ये काश्मीर भारतात सामील करण्याचा प्रस्ताव होता. यामध्ये काश्मीरला विशेष दर्जाचा प्रस्ताव देखील होता. राजा हरि सिंह यांनी मान्य केले आणि भारतीय सैन्य काश्मीरमध्ये शिरली. मात्र, तो पर्यंत पाकिस्तानने काश्मीरचा बराच हिस्सा काबीज केला होता आणि तिथल्या लोकांनी या भागाला स्वातंत्र्य काश्मीर अर्थात ‘आझाद काश्मीर’ म्हणून संबोधले. या भागावर पाकिस्तानचा देखील हक्क नाही, असे तिथल्या स्थानिक लोकांचे म्हणणे असते. मात्र, आझाद काश्मीरचा कारभार पूर्णपणे पाकिस्तान सरकार हाताळत असतो.

काश्मीरचा विशेष दर्जा केंद्र सरकारने केला रद्द

राज्यसभेत सोमवारी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केला. जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा हटवण्यात आला आहे. कलम ३७० आणि कलम ३५ अ मधील काही महत्त्वपूर्ण तरतूदी रद्द करण्यात येणार असून जम्मू-काश्मीरचे दोन भागात विभाजन होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन भागांमध्ये विभाजन होणार आहे. काश्मीर आता राज्य नसून केंद्र शासित प्रदेश असणार आहे. या निर्णयावरुन राज्य सभेत मोठा गदारोळ झाला. काश्मीरमधील स्थानिक पक्ष पीडीपीच्या खासदारांनी या निर्णयचा निषेध केला. याशिवाय या निर्णयामुळे काश्मीरमध्ये मोठा गदारोळ होईल, अशी धमकी देखील त्यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली.

- Advertisement -

हेही वाचा – जम्मू-काश्मीरचे विभाजन होणार; काश्मिरातील कलम ३७० हटवण्याची शिफारस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -