घरदेश-विदेशकुटुंब वाढवण्यासाठी पोलिसाला हवी सुट्टी

कुटुंब वाढवण्यासाठी पोलिसाला हवी सुट्टी

Subscribe

पोलिसांना सुट्ट्या मिळणे तसे कठीणच. सणासुदीच्या काळातही ते ड्युटीवरच असतात. १२-१२ तास ड्युटीवर असल्याने पोलिसांना कुटुंबासाठी वेळच देता येत नाही. त्यामुळे सुट्टीसाठी उत्तर प्रदेशमधील एका शिपायाने एक गमतीशीर कारण दिले आहे.

 

३० ऐवजी ४५ दिवसांची सुट्टी मंजूर

सोम सिंहने ३० दिवसांसाठी सुट्टी मागितली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने दिलेले कारण वाचून त्याच्या वरिष्ठांनी त्याला ३० ऐवजी ४५ दिवसांची सुट्टी मंजूर केली आहे. परंतु सोम सिंहचे सुट्टीचे कारण वाचून त्याची खिल्ली उडवली जाईल. त्यामुळे त्याच्या वरिष्ठांनी त्याला नव्याने अर्ज लिहायला सांगितला. नव्या अर्जामध्ये वेगळे कारण देण्यासही सांगितले. त्यानंतर त्याची सुट्टी मंजूर करण्यात आली.

- Advertisement -

पोलिसांच्या सुट्ट्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पोलिसांना सुट्टी मिळणं तसं नेहमीच कठीण असतं. सुट्टी न मिळणं ही देशभरातील सर्वच पोलिसांची व्यथा आहे. सामान्य कर्मचाऱ्यांना आठवड्याच्या सुट्टीसह सणासुदीच्या काळातही सुट्ट्या असतात. परंतु जेव्हा आपण सुट्ट्यांचा आनंद लुटत असतो, त्याच वेळी पोलीस मात्र त्यांची ड्युटी निभावत असतात. पोलिसांनाही सुट्ट्यांची आवश्यकता असते. सोम सिंहच्या अर्जामुळे पोलिसांच्या सुट्ट्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी पोलिसांनाही सुट्ट्या मिळायला हव्यात अशी मतेसुद्धा ऐकायला मिळत आहेत.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -