घरदेश-विदेशपाकिस्तानात कांदा, टॉमेटो 700 रुपये किलोच्या पार; भारताकडून मदतीची प्रतीक्षा

पाकिस्तानात कांदा, टॉमेटो 700 रुपये किलोच्या पार; भारताकडून मदतीची प्रतीक्षा

Subscribe

पाकिस्तानच्या लाहोर आणि पंजाब प्रांतातील इतर भागांमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे विविध भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाली, यामुळे पाकिस्तान सरकार भारतातून टॉमेटो आणि कांदा आयात करण्याची शक्यता आहे. बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली, लाहोर मार्केटमधील घाऊक विक्रेते जवाद रिझवी यांनी सांगितले की, रविवारी लाहोरच्या बाजारपेठेत टोमॅटो आणि कांद्याचा भाव अनुक्रमे 500 आणि 400 रुपये किलो होता. मात्र रविवारी बाजारात टोमॅटो, कांद्यासह इतर भाज्या नेहमीच्या बाजारापेक्षा 100 रुपये किलोने जास्त दराने उपलब्ध होता. बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमधील भाज्यांच्या पुरवठ्यावर पुरामुळे मोठा परिणाम झाला असल्याने आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढतील.

रिझवी म्हणाले, “येत्या काही दिवसांत कांदे आणि टोमॅटोचे भाव किलोमागे 700 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. तसेच बटाट्याचा भाव 40 रुपये किलोवरून 120 रुपये किलो झाला आहे. वाघा सीमेवरून भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करण्याच्या पर्यायावर सरकार विचार करत असल्याचे कळते. सध्या अफगाणिस्तानमधून लाहोर आणि पंजाबमधील अन्य शहरांमध्ये तोरखाम सीमेवरून टोमॅटो आणि कांद्याचा पुरवठा केला जात आहे.

- Advertisement -

लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा यांनी सांगितले की, पुरामुळे बाजारात सिमला मिरचीसारख्या भाज्यांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकते. ते म्हणाले की, इराणमधून ताफ्तान सीमेवरून (बलुचिस्तान) भाजीपाला आयात करणे तितके सोपे नाही कारण इराण सरकारने आयात आणि निर्यातीवर कर वाढवला आहे.


मोदींबाबत माझे गैरसमज होते, मात्र त्यांनी माणुसकी दाखवली; आझाद यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -