घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रMVP Election : मतमोजणी सुरू; आधी निकाल सेवक सदस्यांचा

MVP Election : मतमोजणी सुरू; आधी निकाल सेवक सदस्यांचा

Subscribe

दोन तासांत स्पष्ट होणार मतदारांचा कल

नाशिक – मविप्र संस्थेच्या मतमोजणीला तब्बल चार तास विलंब झाला असून, दुपारी चार वाजेदरम्यान मतमोजणीला प्रारंभ झाला. सेवक सदस्यांची संख्या केवळ ४०९ असल्याने, या मतमोजणीला आधी सुरूवात झाली आहे. त्यामुळे या सदस्यांचा निकाल सर्वप्रथम लागणार आहे.तासां

मविप्र निवडणुकीत गेल्यावेळी सरचिटणीस नीलिमा पवार यांचे संपूर्ण पॅनलच्या विजयाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर सेवक सदस्यांच्या समाजविकास पॅनलची मतमोजणी सुरू झाली होती.

- Advertisement -

दोन तासांत कल स्पष्ट होणार

जिल्हाभरातील मतपत्रिकांचे वर्गिकरण केल्यानंतर दुपारी चार वाजेदरम्यान प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. या मतमोजणीसाठी २५ टेबल सज्ज ठेवण्यात आले आहेत. या सर्व टेबलवर एकाचवेळी मतमोजणी सुरू होणार असल्याने दोन ते तीन तासांत कोणत्या पॅनलला मतदारांची पसंती आहे, याचा कल स्पष्ट होणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -