घरताज्या घडामोडीराम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर, प्रियांका गांधींचा आरोप

राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर, प्रियांका गांधींचा आरोप

Subscribe

देणगीचा गैरवापर करणे म्हणजे अधर्म आणि पाप तसेच त्यांच्या विश्वासाचा अपमान

काँग्रेस सचिव प्रियांका गाधी वाड्रा यांनी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर जमीन खरेदीवरुन करण्यात आलेल्या आरोपांवरुन निशाणा साधला आहे. राममंदिर निर्मितीसाठी भाविकांनी आणि लोकांनी देणगी दिली आहे. या देणग्यांचा गैरवापर करणं लोकांच्या श्रद्धेचा अपमान करण्यासारखे आहे. असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावावर हा भ्रष्टाचार झाला असल्याचे समोर आले आहे. यावरुनच प्रियांका गांधी यांनी ट्विट करत लोकांच्या देणग्यांचा गैरवापर करणं हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस सचिव आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी ट्विट करत कोरोडो लोकांच्या श्रद्धेचा अपमान ट्रस्टने केला असल्याचे म्हटले आहे. प्रियांका गांधींनी ट्विट करत म्हटले आहे की, कोट्यावधी लोकांनी विश्वास आणि भक्तीमुळे देवाच्या चरणी देणगी अर्पण केली आहे. त्या देणगीचा गैरवापर करणे म्हणजे अधर्म आणि पाप तसेच त्यांच्या विश्वासाचा अपमान आहे. अशा आशयाचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.

- Advertisement -

आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी रविवारी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाराचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच या भ्रष्टाचाराची सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणीही केली होती. राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने करोड रुपयांची जमीन १८ करोडमध्ये खरेदी केली असल्याचा दावा संजय सिंह यांनी केली आहे. हे आर्थिक देवाण-घेवाण प्रकरण असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीच्या मार्फत चकशी व्हावी अशी मागणी संजय सिंह यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान समाजवादी पक्षाच्या आधीच्या सरकारचे मंत्री असलेले आणि आयोध्याचे माजी आमदार पवन पांडे यांनीही अयोध्येत राय यांच्यावर भ्रष्टाराचे असेच आरोप केले आहेत. त्यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. चंपत राय यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून अशा आरोपांना आपण घाबरत नसल्याचे म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -