घरताज्या घडामोडीरेमडेसिवीरची साठवणूक मानवतेविरुद्ध, प्रियांका गांधींचा फडणवीसांवर हल्लाबोल

रेमडेसिवीरची साठवणूक मानवतेविरुद्ध, प्रियांका गांधींचा फडणवीसांवर हल्लाबोल

Subscribe

एका जबाबदार पदावर राहिलेले भाजपा नेत्याचे रेमडेसिवीरची साठेबाजी करण्याचे कृत्य मानवतेविरुद्ध

महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मालकाकडे रेमडेसिवीर इंजेक्श पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासाठी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले होते. परंतु ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी पार्ल्यातील पोलीस स्थानकात धाव घेतली होती. यावेळी पोलिसांशी फडणवीस बोलत असल्याचा व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. देशात महामारी सुरु असताना इंजेक्शनची साठवणूक करुन ठेवणे मानवतेविरुद्ध असल्याचे प्रियांका गांधींनी म्हटले आहे.

राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांचा DCP कार्यालयातील व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, जेव्हा देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाने ग्रासला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी करत आहेत. जीव वाचवण्यासाठी असंख्य लोक रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. परंतु एका जबाबदार पदावर राहिलेले भाजपा नेत्याचे रेमडेसिवीरची साठेबाजी करण्याचे कृत्य मानवतेविरुद्ध असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान प्रियांका गांधी यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, प्रियांका गांधी यांनी फडणवीसांवर सर्वप्रथम ट्विट केले आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची भीती एवढी निर्माण झाली आहे की, राष्ट्रीय पातळीवर असलेल्यानाही त्यांची दखल घ्यावी लागत आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -