घरताज्या घडामोडीकेंद्राचा मोठा निर्णय! १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस

केंद्राचा मोठा निर्णय! १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस

Subscribe

संपूर्ण देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोठ्या मोहीमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना लस आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जात गेली. त्यानंतर १ मार्चला लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाली. या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जातेय. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली. आता देशातील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असून यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याची परवानगी केंद्राकडून मिळाली आहे. यासंदर्भात सातत्याने देशात मागणी केली जात होती. आता हिच मागणी केंद्राने मान्य केली आहे. यामुळे देशातील कोरोना लसीकरणाचा आणखी वेग वाढणार आहे.

- Advertisement -

या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात लस उत्पादक महिन्याला केंद्रीय औषध प्रयोगशाळा ५० टक्के डोस भारत सरकारला पुरवतील आणि उर्वरित ५० टक्के डोस राज्य सरकार आणि खुल्या बाजारात पुरवतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान भारत सरकार सक्रिय रुग्णांच्या संख्या आणि प्रशासनाचा वेग या निकषावर आधारित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लस वाटप करेल. यामध्ये लस वाया जाण्याबाबत विचार केला जाईल आणि या निकषांवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल.

 

आज कोरोना बाबतच्या समस्या आणि लसीकरणाच्या प्रगतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील डॉक्टरांशी संवाद साधला. डॉक्टर, मेडिकल आणि पॅरा-मेडिकल स्टाफ करत असलेल्या सेवेबद्दल मोदींना यावेळी कौतुक केले.

१८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

काही दिवसांपूर्वीच मी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -