घरताज्या घडामोडीPunjab Congress Twitter Handle Hacked: पंजाब काँग्रेसचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक

Punjab Congress Twitter Handle Hacked: पंजाब काँग्रेसचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक

Subscribe

पंजाब काँग्रेसचे अधिकृत ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले आहे. या अकाऊंटद्वारे वेगवेगळे ट्वीट केले जात आहेत. आता काँग्रेसकडून लवकरात लवकार अकाऊंट रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हॅकर्सने पंजाब काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटचा डीपी आणि बँकग्राउंड फोटो बदलला असून शेकडो युजर्सना टॅग करून भरपूर ट्वीट्स केले आहेत. तसेच हॅकर्सने पंजाब काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवर पक्षाचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधींचा एक फोटो पोस्ट केला आहे. राहुल गांधी यांचा फोटो पोस्ट करून हॅकर्सने कॅप्शनमध्ये ‘सच भारत’ असे लिहिले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

72 तासांत चौथ अकाऊंट केले हॅक

72 तासांत हॅकर्सने भारताचे चॉथे ट्वीटर अकाऊंट हॅक केले आहे. यापूर्वी हॅकर्सने 10 एप्रिलला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) भारत आणि 9 एप्रिलला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारताच्या हवामान खात्याचे ट्वीटर अकाऊंट हॅक केले होते.

दरम्यान भारतीय हवामान खात्याचे अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सने त्यावर एनएफटी ट्रेडिंग सुरू केले होते. यामध्ये एक ट्वीटला पिन केले होते, जे एका एनएफटी ट्रेडिंगसंबंधित होते. यावेळी पहिल्यांदा हॅकर्सने अकाऊंटचा प्रोफाईल फोटो बदलला होता. परंतु नंतर फोटो हटवला. भारतीय हवामान खात्याला अकाऊंट पूर्ववत करण्यासाठी जवळपास दोन तास लागले होते.


हेही वाचा – पोलिसाच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू; सासू, पत्नी गंभीर जखमी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -