घरताज्या घडामोडीPunjab Elections 2022: चन्नींचे पंजाबवासीयांना इलेक्शन पॅकेज, विजेच्या दरात प्रति युनिट ३...

Punjab Elections 2022: चन्नींचे पंजाबवासीयांना इलेक्शन पॅकेज, विजेच्या दरात प्रति युनिट ३ रुपयांची सूट

Subscribe

१ लाखपेक्षा अधिक तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत. मात्र १२ वी पास असणाऱ्यांनाच नोकरीसाठी पात्र असतील. काँग्रेसच सरकार आल्याच्या १ वर्षांतच सगळ्यांना नोकरी देण्यात येईल असे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटलं आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसनं मतदारांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पंजाबमध्ये वीजेच्या दरात प्रति युनिट ३ रुपयांची सूट देण्यात आल्याची घोषणा केली आहे. चन्नींचा हा दावा मतदारांना किती प्रभावित करतो हे निकालानंतर स्पष्ट होईल. काँग्रेसकडून अधिकृत ट्विटर हँडलवरुन अनेक घोषणा केल्या आहेत.

काँग्रेसकडून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. पंजाब काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरुन काही घोषणांच्या पोस्ट शेयर करण्यात आल्या आहेत. यावर मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात केलेली वाढ आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यांचीही माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

पंजाबमध्ये निवडणूक जवळ आल्या असताना मुख्यमंत्री चन्नी यांनी केलेल्या घोषणांमुळे काँग्रेसला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. चन्नींनी काही दिवसांपुर्वीच सर्व गौशालांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय़ घेतला होता. तसेच सोलर सिस्टम लावण्यासाठी गोशालांना ५-५ लाख रुपये देण्याबाबत घोषणा केली आहे.

- Advertisement -

युवा मतदारांना प्रभावित करण्यासाठी मुख्यमंत्री चन्नी यांनी काही घोषणा केल्या आहेत. यामद्ये १ लाखपेक्षा अधिक तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत. मात्र १२ वी पास असणाऱ्यांनाच नोकरीसाठी पात्र असतील. काँग्रेसच सरकार आल्याच्या १ वर्षांतच सगळ्यांना नोकरी देण्यात येईल असे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटलं आहे.

उमेदवारांची यादी जाहीर

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण ८६ उमेदवारांच्या नावांचा या यादीत समावेश आहे. यादीनुसार मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी चमकौर साहिब विधानसभा सीटवरुन उमेदवारी लढवतील. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू अमृतसर पूर्व येथून निवडणूक लढवतील आणि उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा त्यांचा मतदारसंघ डेरा बाबा नानक येथून निवडणूक लढवतील.


हेही वाचा : UP Election 2022: सपा अध्यक्ष मुलायम सिंह यादवांच्या घरातच फूट, भाजपमध्ये प्रवेश करणार सून

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -