घरताज्या घडामोडीपंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा भाजपामध्ये प्रवेश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा भाजपामध्ये प्रवेश

Subscribe

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पंजाब लोक काँग्रेस (PLC) हा त्यांचा पक्षही भारतीय जनता पक्षात विलीन केला आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पंजाब लोक काँग्रेस (PLC) हा त्यांचा पक्षही भारतीय जनता पक्षात विलीन केला आहे. पंजाबचे भविष्य पाहायचे असेल तर भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. (Punjab Former CM Captain Amarinder Singh joins bjp)

- Advertisement -

सोमवारी नरेंद्र सिंह तोमर आणि किरेन रिजिजू या मंत्र्यांकडून त्यांना भाजपचे सदस्यत्व मिळवून देण्यात आले आहे. अमरिंदर यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारीही भाजपमध्ये (BJP) दाखल झाल्याचे समजते. यावेळी त्यांनी आमची आणि भाजपची विचारधारा एकच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसपासून फारकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी 2022 च्या निवडणुकीसाठी पीएलसी पक्षाची स्थापना करुन आणि नंतर भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवली होती.

- Advertisement -

हेही वाचा – साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा; राज्याचा यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करू – मुख्यमंत्री शिंदे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -