Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश राहुल गांधींची खासदारकी रद्द; २०२४ ला मोदींना पर्याय कोण?

राहुल गांधींची खासदारकी रद्द; २०२४ ला मोदींना पर्याय कोण?

Subscribe

नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना शिक्षा झाली आहे. त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. शिक्षा कायम झाली तर ते पुढे आठ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यामुळे २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षातील कोणत्या नेत्याचा पर्याय असेल याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक दिग्गज नेते पंतप्रधान बनण्यास इच्छूक होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार होते. मात्र नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता बघता त्यांच्याच गळ्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची माळ पडली. मोदी यांचा कारभार सुरु असताना त्यांना टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षातील अनेकांची नावे पुढे आली. राज्याच्या राजकारणात भाजपला टक्कर देणाऱ्या अनेक नेत्यांचे पंतप्रधान पदासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नाव जाहिर केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नावे आघाडीवर होती.

- Advertisement -

या नेत्यांमध्ये शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. तर ममता बॅनर्जी ह्या आक्रमक आहेत. त्यामुळे यांच्यापैकी कोणाची वर्णी पंतप्रधान मोदी यांना शह देण्यासाठी लागेल हे बघावे लागेल. तसेच आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत राहिले आहे. त्यांनी दिल्लीचा केलेला कायापालट व राबवलेल्या जनहिताच्या योजना यामुळे त्यांची लोकप्रियता देशभरात आहे. मात्र आप भाजपची बी टीम असल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे विरोधी पक्ष त्यांना पाठिंबा देईल का याची शाश्वती नाही. सर्व विरोधकांचे सूर जुळले तर पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी ऐवजी कोणाची वर्णी लागेल हे बघावे लागेल.

 

- Advertisement -

 

- Advertisment -