घरदेश-विदेशराहुल गांधी पप्पू नव्हे, हुशार आणि जिज्ञासू व्यक्ती; रघुराम राजन यांची स्तुतिसुमनं

राहुल गांधी पप्पू नव्हे, हुशार आणि जिज्ञासू व्यक्ती; रघुराम राजन यांची स्तुतिसुमनं

Subscribe

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले, "मला वाटते की राहुल गांधींची ही जी प्रतिमा निर्माण केली आहे, ती दुर्दैवी आहे.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. राहुल गांधी हे पप्पू नाहीत, ते चाणाक्ष नेते आहेत, असं म्हणत आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी राहुल गांधींची खराब प्रतिमा दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. रघुराम राजन गेल्या महिन्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

राहुल गांधी कोणत्याही प्रकारे पप्पू नाहीत: रघुराम राजन
एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले, “मला वाटते की राहुल गांधींची ही जी प्रतिमा निर्माण केली आहे, ती दुर्दैवी आहे. मी जवळपास एक दशक त्यांच्याशी अनेक प्रसंगी संवाद साधतोय. राहुल गांधी हे कोणत्याही अर्थाने पप्पू नाहीत, ते एक हुशार, तरुण, जिज्ञासू व्यक्ती आहेत.”

- Advertisement -

राहुल गांधी सक्षम व्यक्तिमत्त्व
रघुराम पुढे म्हणाले, “मला वाटते की तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम माहीत असले पाहिजेत. जोखीम घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी चांगली समज असणे आवश्यक आहे. राहुल गांधी हे करण्यास पूर्णतः सक्षम आहेत.” 2023 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तसेच उर्वरित जगासाठी कठीण असेल. भारत विकासासाठी आवश्यक सुधारणा करण्यात अपयशी ठरल्याचेही ते म्हणालेत.

कनिष्ठ मध्यमवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून धोरण बनवा
रघुराम राजन म्हणाले की, देशातील निम्न मध्यमवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून धोरणे आखली पाहिजेत. कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका या वर्गाला बसत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधींनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेलाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पंजाबहून लखनपूरमार्गे ही भारत जोडो यात्रा गुरुवारी सायंकाळी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होणार आहे. तर 23 जानेवारी रोजी ही यात्रा जम्मूत पोहोचणार आहे. जम्मूत राहुल गांधी यांची रॅली आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडे आम्ही परवानगी मागितली असल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचाः रायगडमध्ये भीषण अपघात; मालाड येथील नऊ जणांचा जागीच मृत्यू

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -