घरदेश-विदेशगव्हाच्या पिठासाठी रडणाऱ्या पाककडे आहे सोन्याची खाण; अर्थव्यवस्थेला मिळू शकते उभारी

गव्हाच्या पिठासाठी रडणाऱ्या पाककडे आहे सोन्याची खाण; अर्थव्यवस्थेला मिळू शकते उभारी

Subscribe

Pakistan Crises | खाणींचा विचार झाल्यास पाकिस्तानची परिस्थितीत लागलीच बदलू शकेल, असा तज्ज्ञांचा कयास आहे. जगातील सर्वांत मोठ्या सोन्या-तांब्याच्या खाणींमध्ये बलुचिस्तानच्या या खाणीचाही समावेश आहे.

Pakistan Crises | इस्लामाबाद – पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गव्हाच्या पिठावरून तिथे अघोषित गृहयुद्ध सुरू आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरता उपलब्ध असलेले सर्व पर्याय आता संपत आले आहेत. पण असं असतानाही पाकिस्तानकडे एक पर्याय उपलब्ध आहे. देशातील बलुचिस्तान प्रांतातील सोन्याची खाण पाकिस्तानला मोठ्या संकटातून बाहेर काढू शकते.

देशात असलेल्या सोन्या-तांब्याच्या खाणी पाकिस्तानातील आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतात, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. बलुचिस्तानातील या खाणींमध्ये शेकडो टन सोने उपलब्ध आहे. या खाणींचा पाकिस्तानला उपयोग होऊ शकतो. मात्र, या खाणींचा वापर करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु, या खाणींचा विचार झाल्यास पाकिस्तानची परिस्थिती लागलीच बदलू शकेल, असा तज्ज्ञांचा कयास आहे. जगातील सर्वांत मोठ्या सोन्या-तांब्याच्या खाणींमध्ये बलुचिस्तानच्या या रेको दिकच्या खाणीचाही समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानला कटोरा घेऊन जगभर फिरण्यास भाग पाडले; PM मोदींच्या ‘त्या’ व्हिडीओने पाकमध्ये खळबळ

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड नाजूक झाली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना दिलासा देण्याकरता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था रायटर्सच्या एका जुन्या अहवालानुसार, पाकिस्तान सरकारकडे या खाणीच्या रुपाने खूप मोठी संपत्ती देशाकडे आहे. यामध्ये करोडो टन सोने-तांब्याचे भांडार आहे. ही खाण बलुचिस्तान येथील चगाई जिल्ह्यातील रेको दिक कस्बे येथे आहे.

- Advertisement -

एका अहवालानुसार, या खाणीत जवळपास ५९० कोटी टन खनिज भांडार आहे. या खनिज भांडारातून प्रति टन जवळपास ०.२२ ग्रॅम सोने आणि ०.४१ टक्के तांबे काढले जाऊ शकते. ही खाण इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या एका सुप्त ज्वालामुखीजवळ आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार या सोने-तांब्याच्या खाणीचा वापर करून आपली अर्थव्यवस्था उभारू शकतात.

बलुचिस्तान नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. या भागात इतकं सोनं आहे की त्यामुळे पाकिस्तानची गरिबी झटक्यात दूर होऊ शकते. १९९५ मध्ये रेको दिकच्या या खाणीत पहिल्यांदा खोदकाम झालं होतं. पहिल्या चार महिन्यांत २०० किलोग्रॅम सोने आणि १७०० टन तांबे काढण्यात आले होते. या खाणीत ४० कोटी टन सोने उपलब्ध असल्याचा दावाही त्यावेळी करण्यात आला होता. तेव्हा उपलब्ध असलेल्या सोन्याची किंमत त्यावेळच्या बाजारभावानुसार दोन ट्रिलिअन असल्याचं सांगितलं गेलं होतं.

हेही वाचा – पाकिस्तानात खाद्यसंकट तीव्र, कराची बंदरावर अडकले गव्हाचे कंटेनर

डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत रेको डिक प्रोजेक्टच्या निधीला मंजूरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या मूळ करारावर २००६ रोजी सह्या झाल्या होत्या. ज्यात कॅनाडाच्या बॅरिक गोल्ड आणि चिलीच्या एंटोफगास्टा या दोन कंपन्यांनी ३७.५ टक्के प्रत्येकी भागीदारी देण्याचे ठरवण्यात आले होते. तर, बलुचिस्तान सरकारला २५ टक्के भागीदारी मिळाली होती. नव्या करारानुसार, बलुचिस्तान सरकारची २५ टक्के आणि इतर कंपन्यांची २५ टक्के भागीदारी असणार आहे. मात्र, या खाणींचा वापर करणे पाकिस्तानसाठी सध्यातरी कठीण आहे, असंही म्हटलं जात आहे.

हेही वाचा – गव्हाच्या पिठावरून पाकिस्तान गृहयुद्धाच्या तोंडावर!

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -