घरमनोरंजनInternational Dance Day: महाराष्ट्रातील 'या' लावण्यांचे प्रकार तुम्हाला माहितेयत का?

International Dance Day: महाराष्ट्रातील ‘या’ लावण्यांचे प्रकार तुम्हाला माहितेयत का?

Subscribe

आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे. अशातच आपण मराठी सिनेमांमध्ये अनेक लावण्या पाहिल्या आहेत. त्यापैकी गाजल्या ही. ढोलकीचा ताल असो ते अप्सरा आली अशा लावण्यांनी सर्वांना त्यावर नाचण्यास भागच पाडले आहे. आज सुद्धा महाराष्ट्रात लावणी या प्रकाराला लोकनृत्यांमध्ये फार मोठा दर्जा दिला जातो. परंतु तुम्हाला महाराष्ट्रातील लावण्यांचे किती प्रकार आहेत हे माहितेयत का? याच बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

लावणी ही बऱ्याच वेळा तमाशाचा भाग म्हणून सादर केली जाते. पण खरंतर ‘लवण’ म्हणजे सुंदर. ‘लवण’ शब्दावरुनच ‘लावण्यगीत’ किंवा ‘लावणी’ असा शब्द तयार झाला. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे लावणी. लावणीत पारंपरिक गाण्यावर नृत्य केले जाते. पारंपरिक लावणी करताना खरंतर ढोलकी, तुणतुणं,पेटी आणि मंजिरा यासारखी वाद्ये वापरली जातात.

- Advertisement -

-निर्गुणी लावणी
पूर्वीच्या काळात निर्गुणी लावणीतून समाज प्रबोधनाचे काम केले जायचे. ज्यामध्ये भक्तीरसाचा ही समावेश होता.

-श्रृंगारी लावणी
या लावणीची लय ही सेन्शुअस आणि इरोटी असायची. या लावणीचे आणखी दोन प्रकार आहेत. ते म्हणजे फडाची लावणी आणि बैठकीची लावणी.

- Advertisement -

या व्यतिरिक्त जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते.

मराठीतील गाजलेल्या लावण्या
-दिसला गं बाई दिसला
१९७२ रोजी प्रदर्शित झालेला व्ही शांताराम यांच्या पिंजरा सिनेमाने दिग्गज अभिनेते श्रीराम लागू आणि संध्या यांना लोकप्रिय बनवले. हा संपूर्ण सिनेमा लावणी आणि त्याच्या संदर्भातील काही गोष्टींवर आधारित आहे. या सिनेमातील लावणी दिसला गं बाई दिसला ही इव्हरग्रीन आहे. आज ही लावणी आवर्जुन ऐकली, पाहिली किंवा कार्यक्रमांमध्ये सादर ही केली जाते.

-रेशमाच्या रेघांनी
मराठी तितुका मेळवावा सिनेमातील ही लावणी आहे. शांताराम शेळके यांनी ही लिहिली होती तर आनंदघन यांनी त्याला संगीत दिले होते. तर आशा भोसले यांनी ती गायली होती.

-बुगडी माझी सांडली गं
आशा भोसलेच्या आवाजातील ही लावणी सांगत्ये ऐका सिनेमातील आहे. ग दि माडगुळकर हे याचे गीतकार होते तर राम कदमांनी याला संगीत दिलं होत.

-मला लागली कुणाची उचकी
पिंजारा सिनेमातील ही सर्वाधिक गाजलेली लावणी आहे. जे जगदीश खेबुडकर यांनी ती लिहिली होती. तर उषा मंगेशकारांनी ती गायली होती.

या व्यतिरिक्त अप्सरा आली, वाजले की बारा, चला जेजुरीला जाऊसह अन्य काही लावण्या सुद्धा प्रचंड गाजल्या आहेत.


हेही वाचा- लॉकडाऊनच्या आठवणींना उजाळा देणारा ‘अनलॉक जिंदगी’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -