घरताज्या घडामोडीआम्ही शेतकरी आंदोलनकर्त्यांसोबतच, राहुल गांधी यांचे सूचक ट्विट

आम्ही शेतकरी आंदोलनकर्त्यांसोबतच, राहुल गांधी यांचे सूचक ट्विट

Subscribe

शेतकरी आंदोलनाला ७ महिन्यांचा कालावधी पुर्ण

दिल्लीच्या सीमेवर मागील ७ महिन्यांपासून शेतकरी केंद्र सरकारच्या वादग्रस्त ३ कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहे. या आंदोलनाला २६ जून २०२१ रोजी ७ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत आमचा शेतकरी आंदोलकांना पाठिंबा असून आजही आम्ही शेतकरी आंदोलकांसोबत असल्याचे म्हटलं आहे. काँग्रेसचा शेतकऱ्यांना पाठिंबा असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारने अजूनही कृषी कायदे मागे घेतले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला संघर्ष सुरुच ठेवला आहे.

देशातील पंजब, हरियाणामधील शेतकऱ्यांनी मागील ७ महिन्यांपासून केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. केंद्र सरकारने आणलेले ३ वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मागणी देशातील शेतकऱ्यांनी केली आहे. काही शेतकरी हे दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही आंदोलन करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विट करत म्हटलं आहे की, अजूनही आम्ही सत्याग्रही शेतकऱ्यांसोबतच आहोत. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज शेती वाचवा, लोकशाही वाचवा दिवस पाळत आहेत. शेतकऱ्यांनी आतापर्यंत बहुतांश राज्यातील राज्यपालांची भेट घेतली आहे.

- Advertisement -

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील शेतकरी मागील ७ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी २६ नोव्हेंबर २०२० रोजी या आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकरी आंदोलनाला ७ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. याासाठी सर्व राज्यातील शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी हेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलक राकेश टिकैत याच्यात बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. परतु अद्याप या कायद्यांवर तोडगा निघाला नाही.

- Advertisement -

राकेश टिकैत यांना अटक नाही

शेतकरी आंदोलनाला ७ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. यामुळे देशव्यापी आंदोलनादरम्यान राकेश टिकैत यांना अटक करण्यात आली असल्याचे माहिती पसरत आहे. परंतु राकेश टिकैत यांना अटक केली असल्याच्या बातमीचे पोलिसांकडून खंडण करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे की, राकेश टिकैत यांना अटक करण्यात आली असल्याच्या बातमीत तथ्य नाही. खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जे खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -